BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून त्यांनी घेतला निरोप

 


शिराळा,ता.२५: गेले वर्षभर तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेला  काळजाचा तुकडा क्षणार्धात डोळ्या समोर  मातीआड गेला. चिमुकल्याच्या आठवणीने घायाळ झालेले माता पिता जड अंतःकरणाने  बाळाचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून तडवळे गावचा निरोप घेतला.   पोराच्या शिक्षणाची आभाळभर स्वप्न घेऊन  त्याच्यासह बाहेर पडलेल्या आई वडिलांवर  पाहिलेल्या स्वप्नांचा चक्कचुर करून बाळाला तिथेच सोडून पुन्हा माघारी फिरण्याची वेळ आली.त्यावेळी खोपट्यावर भयाण शांतता पसरून उपस्थित सर्वांचे डोळे पाणवले. 

आपल्या नशिबी आलं ते आपल्या पोरांच्या नशिबी येऊ नये म्हणून आई वडील रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. त्याच प्रमाणे मुलांना चांगलं शिक्षण देऊ म्हणून हातात कोयता घेवून आनंदगाव (ता.माजलगाव ) जि .बीड येथील शमशुद्दीन निजामुद्दीन शेख हे आपल्या पत्नी व एक वर्षाच्या सुफीयान या मुलाला सोबत घेऊन बाहेर पडले. शिराळा तालुक्यात ऊस तोड मजूर म्हणुन दाखल झाले.   शमशुद्दीन यास दोन मुले मोठी मुलगी व लहान मुलगा. मुलगी चार वर्षांनी असल्याने ती गावी होती.सुफीयान एक वर्षाचा असल्याने सोबत होता.

त्यांचे नेहमी प्रमाणे तोडणीचे काम सुरू होते. संसार सुखाने सुरू होता. मात्र सोमवार २२ फेब्रुवारी हा त्यांच्यासाठी काळ बनून येईल याची पुसटशी कल्पना ही त्यांना नव्हती. सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास शमशुद्दीन शेख  आपल्या पत्नी व एक वर्षाच्या मुलासह ऊस तोडणीसाठी तडवळे येथे शेतात गेले होते. तडवळे येथील मानकांडे शेतात कृष्णात शामराव पाटील या शेतकऱ्यांचा ऊस तोडत असताना मुलगा सुफीयान यास  निलगिरी झाडाखाली सावलीला मेव्हणीची सात वर्षाची मुलगी तरनुम हिच्या सोबत ठेवले होते. सर्वजण ऊस तोडण्यात मग्न होते. तरनुम पाणी पीत असताना अचानक उसात दबा धरून बसलेल्या  बिबट्याने पाठीमागून सुफीयान याच्यावर झडप घालून त्याची मान पकडून त्यास  आई वडिलां समोर फरफट नेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. शेख कुटुंबियांवर शोककळा पसरली.  गाव जवळ नसल्याने सुफीयानला शिराळा येथेच दफन केले. चार दिवस ऊसतोडणी मजुरांच्या खोपटावर शांतता होती.  ऊस तोडणी बंद होती. ज्याच्या साठी राबायच तोच नाही. या ठिकाणी राहिलो तर बाळाच्या आठवणी सतावत रहाणार म्हणून शेख कुटुंबाने कोयता सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाळाचा चेहरा डोळयात साठवून त्याच्या आठवणी उराशी बाळगून गावाकडची वाट धरली. त्यांना निरोप देताना खोपट्यावरील सर्व गहिवरले.

बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा

ज्याच्यासाठी आले तोच गेल्याने त्याचा चेहरा डोळ्यात व आठवणींना हृदयात साठवून  त्यांनी घेतला निरोप  

-----------------------------------------------------------------------

एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर 

------------------------------------------------------------------------------------

बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं 

बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा



------/----------------/-------------------/------------------/--------------/

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी



नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू

------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Post a Comment

0 Comments