शिराळा २३:शिराळा तालुक्यातील पत्रकारांना कोरोना लस प्राधान्याने उपलब्ध करून देण्याची मागणी प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, शासकीय निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामासारखेच पत्रकारांना देखील समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून वार्तांकन करावे लागते. सामाजिक कार्यात अग्रेसर राहून लोकांच्या अडीअडचणी सोडाव्या लागतात. कोरोना सारखा महाभयंकर आजार लक्षात घेता पत्रकारांचे आरोग्य जपणे सामाजिक व त्यांच्या पारिवारिक दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. मुळातच ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा अत्यल्प आहेत. या सगळ्याचा विचार करून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कोरोनाची लस प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यावेळी प्रेस क्लब ऑफ शिराळा चे अध्यक्ष विनायक गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश हसबनीस, उपाध्यक्ष विकास शहा, सचिव डॉ. शिवाजीराव चौगुले, कार्यकारी सदस्य प्रीतम निकम, अजित महाजन, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी हंबीराव देशमुख, विठ्ठल नलवडे आदी उपस्थित होते.
हे अवश्य वाचा👇
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments