शिराळा:शिराळा तालुका व्यापारी संघटना व शिराळा व्यापारी महासंघाच्यावतीने आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देताना संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख , कैट चे प्रदेश सचिव अविनाश चितुरकर , चंद्रकांत जाधव , विश्वास कदम , सचिन शेटे , उद्धव खुर्द , दस्तगीर अत्तार , निसार मुल्ला , जगदीश पाटील
शिराळा,ता.२४: शिराळा तालुका व्यापारी संघटना व शिराळा व्यापारी महासंघाच्या वतीने वस्तू आणि सेवा करातील ( GST ) कायदयातील जाचक तरतुर्दीच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कैट ) कडून शुक्रवार दिनांक २६ रोजी देशव्यापी व्यापार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यात तालुक्यात ही बंद ला पाठिंबा बाबत आमदार मानसिंगराव नाईक , तहसीलदार गणेश शिंदे , पोलीस निरीक्षक विशाल पाटील , मुख्याधिकारी योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये निवेदनात म्हटले आहे, देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यावसायिकांचे काम सोपे होईल अशी अपेक्षा होती मात्र जीएसटी कायदयामध्ये गेल्या चार वर्षामध्ये शंभर वेळा सुधारणा झाल्यामुळे ही करप्रणाली अतिशय किचकट व गुंतागुंतीची ठरत आहे . अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे . व्यापाऱ्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर दंडाबरोबर कारावासाच्या शिक्षेची तरतूद या करप्रणालीत करण्यात आली आहे . जीएसटी अधिकारी कोणत्याही वेळेस व्यापाऱ्यांची जीएसटी नोदणी रद्द करु शकतात . कायदा राबविणाऱ्या अधिकाऱ्यांना अवाजवी अधिकार दिले आहेत . नैसर्गिक न्यायतत्वानुसार व्यापा - यांना बाजू मांडण्याची संधी देखील दिलेली नाही हे करदात्यावर अन्याय करणारे आहे . तसेच अन्न औषध प्रशासन ( TSSAS ) कायदयाचे केंद्रीकरण करण्यात आले आहे . या कायदयामध्ये थोडीशीसुद्धा चुक झाल्यास भरमसाठ दंडाची तरतुद केलेली आहे . वरील कायदयातील तरतुदींच्या निषेधार्थ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( CAIT ) या आवाहनानुसार शिराळा तालुक्यातील व शहरातील संपूर्ण व्यापार बंद राहील.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल पारेख , कैट चे प्रदेश सचिव अविनाश चितुरकर , चंद्रकांत जाधव , विश्वास कदम , सचिन शेटे , उद्धव खुर्द , दस्तगीर अत्तार , निसार मुल्ला , जगदीश पाटील आदी उपस्थित होते.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments