शिराळा,ता.२: शिराळा पोलीस ठाण्यात येणा- या प्रत्येक नागरीकाला दर्जेदार सेवा पूरविणे , पोलीस ठाण्याचे
दैनंदिन कामकाज गुणवत्ता पूर्वक करता यावे . याकरीता , शिराळा पोलीस ठाणेतील पोलीस अंमलदारांची कायदयाची लेखी परीक्षा साई संस्कृती हॉल येथे घेण्यात आली .
या परीक्षेमध्ये पोलीस हवलदार विकास नांगरे यांनी १०० पैकी ७८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला , सहायक पोलिस फौजदार गणेश झांजरे यांनी ७४ गुण मिळवून द्वितीय तर पोलीस हवलदार. कालिदास गावडे यांनी ७२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे . परीक्षेत ४० पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला . भारतीय दंड संहिता ४०, फौजदारी दंड संहिता ३० , महाराष्ट्र पोलीस अधिनियम २० तर भारतीय पुरावा कायदा १० अशी १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली .विजेत्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांचे हस्ते रोख रक्कम व परीतोषीक देवून सन्मान करण्यात येणार आहे.सदर परीक्षेचे नियोजन सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील,पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर यांनी केले. ही परीक्षा जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments