शिराळा,ता.२४: फेरफार नोंदणी बाबत लोकांची गैरसोय व अडवणूक होऊ नये म्हणून तहसीलदार कार्यालयात एक महिन्यासाठी फेरफार नोंदणी कक्ष स्थापन केला असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
यावेळी तहसीलदार शिंदे म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्या प्रेरणेतून आम्ही हा उपक्रम १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीसाठी सुरू केला आहे. लोकांना तलाठी स्थरावर फेरफार नोंदनी अर्जा बाबत काही अडचणी असतील अथवा अर्ज स्वीकारत नाहीत,अडवणूक होत असेल तर अशा लोकांनी आपल्या नोंदीचे अर्ज या कक्षाकडे पाठवावेत. ते अर्ज संबंधित तलाठी यांच्याकडे पाठून अर्ज निर्गत केले जातील. तरी ज्या लोकांच्या नोंदी प्रलंबित आहेत त्या लोकांनी प्रथम तलाठी यांच्याकडे अर्ज द्यावा,त्या ठिकाणी काही अडचण असल्यास या कक्षाकडे अर्ज करावा.त्यासाठी स्वतंत्र माणसाची नेमणूक केली आहे.त्या ठिकाणी केलेल्या अर्जाची पोहच देऊन नोंदीची कार्यवाही पूर्ण केली जाईल. तरी या उपक्रमाचा नागरीकांनी लाभ घ्यावा.
यावेळी नायब तहसीलदार व्ही डी महाजन , नायब तहसीलदार सचिन कोकाटे उपस्थित होते.
हे अवश्य वाचा👇
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments