शिराळा :कुस्ती मल्लविद्या महासंघाचा कोरोना योद्धा पुरस्कार शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांना जाहीर झाला असल्याची माहिती महासंघाचे जिल्हा प्रवक्ते विनायक गायकवाड यांनी दिली. यावेळी राज्य उपाध्यक्ष राहुल जाधव, आनंदराव पाटील, विकास शिरसठ उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना विनायक गायकवाड म्हणाले, तहसीलदार गणेश शिंदे यांनी कोरोना काळात अतुलनीय असे कार्य केले आहे. शासकीय कर्मचारी, पोलिस, आरोग्य, शिक्षण विभागा बरोबरच राजकीय व सामजिक संघटना यांचा समन्वय साधून तालुक्यात नियोजनबध्द काम केले आहे. त्या काळात ते अहोरात्र काम करत जनतेची सेवा करत होते. त्यांच्या अनेक कृतीतून वेळोवेळी माणुसकीचे दर्शन घडत होते. बऱ्याच ठिकाणी स्वतः उपस्थित राहून वेळ काळ न पाहता रुग्णांना सेवा पुरवत होते. तर अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देत त्यांच्या समस्यांचे निराकरण करत होते.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धा हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑलंपिकवीर, ज्येष्ठ कुस्ती मार्गदर्शक बंडा मामा रेठरेकर यांच्या हस्ते आणि कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पै. गणेश मानुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. ७ फेब्रुवारीला शेडेगेवाडी येथे होणाऱ्या कुस्ती मल्लविद्या केंद्र द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देखील गौरविण्यात येणार आहे.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments