BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कुसाईवाडी (शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखाण्यामार्फत होणाऱ्या कुसाईमाता पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ

 


कुसाईवाडी (शिराळा) येथे कुसाईमाता पाणी योजनेच्या कामाचा कुदळ मारून शुभारंभ करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी उपस्थित मान्यवर.

शिराळा  : कुसाईमाता पाणी योजनेमुळे पाण्यापासून वंचित जमिनीला पाणी मिळून शेती बारमाही  पिकेल व त्यामाध्यमातून येथील शेतकऱ्यांचे राहणीमान, आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

कुसाईवाडी (शिराळा) येथे विश्वासराव नाईक कारखाण्यामार्फत होणाऱ्या कुसाईमाता पाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, कारखाण्यामार्फत शिराळा व शाहूवाडी तालुक्यात अनेक पाणी योजना राबवून हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आणली आहे. शेतीसाठी पाणी ही मूलभूत गरज आहे. ही गरज ओळखुन दुरंदेवाडी, कुसाईवाडी, हुंबरवाडी, पन्हाळकरवाडी या गावांसाठी कुसाईमाता पाणी पुरवठा योजना उभारणीचे काम आज सुरू झाले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर दोनशे एकर क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर व जीवनमान उंचावेल. 

ते म्हणाले, अशीच परिस्थिती तालुक्याच्या उत्तर भागाची आहार. म्हणून वाकुर्डे योजना पूर्ण करण्यासाठी मी आग्रही आहे. योजनेचे पाणी उत्तर विभागात आणले असून कालवे, पोट कालवे आदींच्या माध्यमातून पाणी प्रत्येकाच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे येत्या काळात होईल. शेतीसाठी पाणी आणि बेरोजगारांच्या हाताला काम हा मूलमंत्र घेऊन मी सार्वजनिक विकासात पुढे आहे. विश्वास व विराज उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मतदार संघातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे.

प्रारंभी स्वागत उपसरपंच भास्कर पवार यांनी केले. प्रास्ताविक अविनाश पवार याने केले. युवा नेते विराज नाईक, पी. आर. पोतदार, बाबासाहेब परीट, सोसायटी अध्यक्ष भीमराव पवार यांची भाषणे झाली. 

दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, युवा नेते विराज नाईक, विश्वासचे संचालक विष्णू पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, पी. आर. पोतदार, सरपंच विनोद पन्हाळकर, शेतकरी संघटनेचे देवेन्द्र धस, दुरंदेवाडीचे सरपंच गोविंद दळवी, दिलीप भोगावकर, आनंदा शिराळकर, नामदेव, दिनकर साळुंखे, अमोल यमगर, पाणी संस्था अध्यक्ष निलेश काटके, दिनकर महिंद, अविनाश पवार, आनंदा भुरके, रामचंद्र मुदगे, शंकर दळवी, शिवाजी खोत, कृष्णा खोत, आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. आभार धोंडीराम पवारयानी मानले.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 

. . . . . . . . . . . . . . . . . . .


Post a Comment

0 Comments