शिराळा : चांदोली अभयारण्यातील जैवविविधतेचा आनंद घेण्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी असताना सुचवलेला जनीच्या आंब्या पासूनचा नवीन रिंग रोड पर्यटकांसाठी लवकरच खुला होणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
याबाबत माहिती देताना शिवाजीराव नाईक म्हणाले, चांदोली परिसर आणि येथील अभयारण्याचा पर्यटनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त विकास कसा करता येईल आणि येथे असलेल्या जैवविविधता आणि निसर्गाचा लाभ पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर घेता यावा म्हणून गेली अनेक वर्ष वैयक्तिक पातळीवर शासन दरबारी प्रयत्न करत होतो. तत्कालीन मंत्री महोदय व मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या होत्या. यातीलच एक भाग म्हणजे पर्यटकांना झोळंबी चौकीपासून जनीच्या आंब्याला वळसा घालून पायर माळ, घोडे माळ येथून जलाशयाचा शेजारील रिंग रस्ता व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्या प्रयत्नाला यश आले असून या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच हा रस्ता पर्यटकांसाठी खुला होणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक समाधान चव्हाण, महादेव मोहिते आणि गोविंद लंगोटे या अधिकाऱ्यांच्या बरोबरच मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांनी याकरता विशेष कष्ट घेतले आहे.
सध्या पर्यटकांना अभयारण्य पाहण्यासाठी जाधववाडी चौकीपासून झोळंबी पर्यंत जाता येते आणि त्याच रस्त्याने पाठीमागे यावे लागते. म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी असताना जलाशयाच्या शेजारील रिंगरोड सुचवला होता. आणि त्याची मागणी शासन दरबारी लावून धरली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने आणि शासनाला पर्यटकांच्या साठी हा रस्ता किती महत्वपूर्ण आहे याची माहिती पटवून दिल्याने हा रस्ता करण्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू झाले होते. थोड्याच दिवसात हा रस्ता पूर्ण होऊन तो पर्यटकांसाठी खुला होईल. त्यामुळे पर्यटकांना आता जनीच्या आंब्यापासून एका बाजूला विस्तीर्ण असा वसंत सागर जलाशय तर दुसर्या बाजूला घनदाट अरण्य, त्यातील छोटे मोठे धबधबे, विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी हे आता आणखीन जवळून पाहता येणार आहे. आणि हा एक नवीन जंगल सफारीचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.
बातमी वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा
एकाच हाता पायावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या दिव्यांग दाम्पत्याला कोणी घर देता का घर
------------------------------------------------------------------------------------
बिबट्यांन बाळावर झडप घातली अन एका क्षणात होत्याचं न्हवतं केलं
बातम्या व शॉर्टफिल्म
बातमी वाचण्यासाठी
क्लिक👇 करा
------/----------------/-------------------/------------------/--------------/
शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक
👇
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी
नातवासाठी मासे पकडायला गेलेल्या आजी आजोबांचा दुर्दैवी मृत्यू
------------------------------------------------------------------
चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ
मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट
सफर चांदोली तें उदगिरी जंगल
बैलाला वाचवण्याचा थरार पहा
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments