BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत बिबट्यांना मुबलक खाद्य उपलब्ध होण्यासाठी ब्रेडिंग सेंटर सुरू करणार- पालकमंत्री जयंतराव पाटील

 


नाटोली (ता. शिराळा) येथील नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व आरोग्य उपकेंद्राच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलताना मंत्री जयंतराव पाटील,सोबत आमदार मानसिंगराव नाईक, सरपंच सरपंच उषाताई पाटील, उपसरपंच काशीनाथ पाटील, सोसायटी अध्यक्ष सुरेश कापूरकर, उपाध्यक्ष संभाजी पाटील,

शिराळा,ता १५:चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याना मुबलक खाद्य उपलब्ध होण्यासाठी उद्यानात ब्रेडिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी केले.

नाटोली (ता. शिराळा) येथील शतक महोत्सवी संस्था असलेल्या नाटोली सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व ६४.५५ लाख रुपये किंमतीच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी आमदार मानसिंगराव नाईक होते.

यावेळी पाटील म्हणाले, बिबट्याना आत पुरेशे अन्न मिळाले तर ते बाहेर मानवी वस्तीत येणार नाहीत. या सेंटरसाठी डी.पी.सी.सी.तुन निधी देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे प्राण्यांची व पर्यटकांची संख्या वाढेल. भुईकोट किल्यावर संभाजी महाराजांच्या स्मारकाचा अजित दादांना भेटून प्रश्न मार्गी लावू.चांदोली पर्यटनाच्या वाढीसाठी सर्वतोपरी मदत करू. यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आपल्या भागात आणून पर्यटन सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करू. वाकुर्डे योजना आपणाला पूर्ण करायची आहे. जिल्हापरिषद शाळांचा कायापालट करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे.

आमदार नाईक म्हणाले, मंत्री जयंतराव पाटील यांच्यामुळे वाकुर्डे योजनेला भरीव निधी मिळू लागला आहे. शिराळा येथील भुईकोट किल्यावर संभाजी महाराज यांच्या स्मारकाची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नाटोली सेवा सोसायटीचे काम  आदर्शवत आहे.

प्रारंभी नाटोलीचे सुपुत्र व पांडूरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूरचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.

 यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, परिषद सदस्य अश्विनीताई नाईक,सभापती वैशालीताई माने, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, भूषण नाईक, सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, दूध संघाचे संचालक अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, सरपंच उषाताई पाटील, उपसरपंच काशीनाथ पाटील, सोसायटी अध्यक्ष सुरेश कापूरकर, उपाध्यक्ष संभाजी पाटील, आनंदराव चव्हाण, सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचलन विजय लोहार यांनी केले.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले

Post a Comment

0 Comments