शिराळा, ता.५: येथील विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात शिराळा तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने वाढीव बिला संदर्भात माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोक व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
यावेळी नाईक म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचा या महाआघाडी सरकारच्या कारभारा विरोधात तिरस्कार निर्माण झाला आहे. विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांशी समन्वय साधून काम करावे. लोंबकळत असणाऱ्या तारांचा सर्व्हे करून त्या सुस्थितीत करा. शेतकऱ्यांचे कोरोना काळातील वीज बील माफ करावे.
सुखदेव पाटील म्हणाले, वीज तोडण्याची गडबड करू नये लोकांच्यात याबाबत तीव्र भावना आहेत. कर्मचाऱ्यांना दगा फटका झाल्यास त्यास विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील. विनाकारण गरीब शेतकऱ्यांना वेठीस धरू नये.
यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील, प्रकाश पाटील, सम्राट शिंदे, माजी उपसभापती आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका राजश्री यादव,माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, रणजितसिंह नाईक,पांडुरंग गायकवाड, पंचायत समिती सदस्या सारिका पाटील, नगरसेवक वैभव गायकवाड, दिलीप कदम, योगेश कुलकर्णी, बबलू शेळके, धनाजी नरुटे, रघुनाथ पाटील उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments