मांगले येथे डॉ. . मच्छिंद्र सकटे यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी सत्कार करताना प्रा. दीपक तडाखे, विजय गराडे, अरुण पाटील, दत्तात्रय तडाखे. |
मांगले :-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या मंगला या कादंबरी मध्ये कांदे व मांगले परिसरासह वारणा काठचे वर्णन आहे. त्याच वारणा काठावरील मांगले या गावामधून सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्त अभिवादन व्हावे अशी अपेक्षा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केली. ते मांगले येथेल आण्णा भाऊंच्या साहीत्यातील वारणा काठच्या परिसराची पहाणी प्रसंगी बोलत होते.
डॉ. मच्छिंद्र सकटे म्हणाले, आण्णा भाऊंच्या साहीत्याच्या माध्यमातून जो वारणा परिसर साता समुद्रापार पोहचला. त्याच वारणा खोऱ्यातील मांगले गावच्या वतीने आण्णा भाऊंच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन व्हावे. त्यामुळे पुन्हा एकदा वारणा खोऱ्याच्या इतिहासाला उजाळा मिळेल. त्यामुळे नव्या पिढीला या इतिहासातून नक्कीच प्रेरणा मिळेल. यावेळी पत्रकार प्रा. दिपक तडाखे, विजय गराडे, अरुण पाटील, दत्तात्रय तडाखे, महादेव समिन्द्रे, अमित तडाखे, दिलीप तडाखे, विजय तडाखे आदी उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments