BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ.यशवंतराव कुलकर्णी-जलसंपदामंत्री जयंतराव पाटील

 


शिराळा, ता.१९: साखर उद्योगात चांगले काम करणाऱ्यांनाच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ही संस्था साखर उद्योगाला दिशा देणारी देशातील एकमेव  संस्था असून  यामध्ये डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी  पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात वेगवेगळे प्रयोग राबवत आर्थिक , तांत्रिक सुधारणा केली त्यामुळे कारखान्याला फायदा  झाला. हे  उल्लेखनीय काम पाहून त्यांना वसंतदादा इन्स्टिटयूटनी बेस्ट एम डी पुरस्कार दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. नाटोली (ता. शिराळा) डॉ.यशवंत कुलकर्णी  बेस्ट एम.डी.पुरस्कार मिळाल्याने आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, सभापती वैशाली माने, जि.प. सदस्या अश्विनी नाईक, माजी जी. प सदस्य महादेव कदम, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले, डॉ.यशवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट  मिळालेल्या पुरस्कारामुळे नाटोली गावाचा दृष्टीने अभिमानाची बाब आहे. जग फार मोठे आहे.यशस्वी होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्या गावातील मुलांनी जगात जाऊन स्पर्धा केली पाहिजे. त्यामध्ये निश्चित आपल्याला यश प्राप्त होते , हे कुलकर्णी यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने  सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर  ठेऊन आजच्या तरुणांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. 

मानसिंगराव नाईक म्हणाले, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कारखानदारीमध्ये  आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवत वसंतदादा इन्स्टिट्युटचा  सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक हा  बहुमान मिळवला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने शिराळा तालुका व नाटोली गावाच्या लौकिकात भर पडली आहे. कार्यक्रमास माजी सभापती सम्राटसिंह नाईक, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक निबंधक बी.एस. खताळ, सरपंच उषा पाटील, अनिल पाटील,सुरेश कापूरकर उपस्थित होते. 


मानसिंगभाऊंचे पाठबळ पाठीशी

सुरुवातीच्या काळात मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मानसिंगभाऊ यांनी मला अनेक पुस्तके उपलब्ध करून दिली त्यानंतर पुढे साखर उद्योगात व प्रचिती दूध संघात काम करण्याची संधी दिली. या दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करत बाहेर पडलो व सांगोला साखर कारखाना गाठला व पुढे चांगले काम करत असताना सहकार तपस्वी कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या बरोबर काम करण्याचे भाग्य मिळाले. व आता साखर उद्योगातील तज्ञ आ.प्रशांत परिचारक यांच्याबरोबर काम करत आहे. म्हणून माझ्या जडणघडणीत भाऊंचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सामर्थ्याने बाहेर पडल्यामुळे घडलो गेलो म्हणून आजच्या युवकांनी मिळालेल्या संधीचे सोने करत यशस्वी होणे महत्वाचे आहे.

-डॉ. यशवंत कुलकर्णी 

कार्यकारी संचालक

महत्वच्या बातम्या व शॉर्टफिल्म

बातमी वाचण्यासाठी  

क्लिक👇 करा

शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावर होणार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक-आमदार मानसिंगराव नाईक

👇



------------------------------------------------------------------

चालत्या मोटरसायकल मध्ये आढळला नाग पहा संपूर्ण व्हिडीओ



मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची झोळंबीला भेट



सफर चांदोली तें उदगिरी जंगल



बैलाला वाचवण्याचा थरार पहा



लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

रुपेशची मृत्युशी झुंज अखेर ११ व्या दिवशी ठरली अपयशी

--------------------/--------------/-----------------/-----------------

मोटरसायकल अपघात होऊन अन्न पाण्याशिवाय उन्ह आणि कडाक्याची थंडी अंगावर झेलत ओघळातच तो राहिला जिवंत तब्बल सात दिवस वाचा चित्तथरारक कहाणी

---------------------------------------------------------------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले



Post a Comment

0 Comments