BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५० वर्षाने मिळाली उपसभापतीपदाची संधी

 


शिराळा पंचायत समितीच्या उपसभापती पदी बी.के.नायकवडी यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचा नागरी  सत्कार करताना आमदार मानसिंग भाऊ नाईक व अन्य मान्यवर.

चरण:  बी.के.नायकवडी हे लोकांना, शेतक-याना नाडणा-या   भाजप च्या ध्येयधोरणावर हल्ला करून. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत .क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचारांचे पाईक असणारे व कार्यतत्पर असणारे नेतृत्व सर्वसामान्य लोकांना हवे होते. जे लोकांना हवे तेच पक्षाने केले.त्यांच्या माध्यमातून तळागाळातील, शेतकरी, कष्टकरी ,शेतमजुर याना न्याय मिळवून देण्यासाठी ते तळमळीने काम करतील असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

     चरण (ता.शिराळा) येथील मुंबई स्थित गणेश मित्र मंडळ व चरण ग्रामस्थ यांच्या वतीने बी.के.नायकवडी यांच्या  आयोजित नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. 

       यावेळी नाईक म्हणाले, शेतकरी, कष्टकरी यांना चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करून न्याय देण्याचे काम बी.के.नायकवडी यानी केले आहे. अशा चळवळीच्या कार्यकर्त्याची   काम करण्याची  हातोटी पाहुन पक्षाने सर्व सामान्यांना हवे असलेले नेतृत्व म्हणून बी.के.यांची तालुक्याच्या उपसभापती पदी निवड केली.

       शेकाप चे कोल्हापूर चे भारत पाटील म्हणाले,आमदार मानसिंग भाऊ यांनी  चळवळीतील कार्यकर्त्याला प्रशासनात काम करण्याची संधी  दिली  त्यामुळे त्या पदाची गुणवत्ता वाढवली आहे.

 बी.के.नायकवडी म्हणाले की, पदमभूषण क्रांतिवीर डाॅ नागनाथअण्णा नायकवडी यांनी पाठीवर थाप मारून लढायला शिकवले .शिक्षक हा चार भिंतीत न राहता तो  समाजाचा शिक्षक असला पाहिजे .या त्यांच्या विचारानेच प्रेरीत होवून रंजल्या गांजल्या, कष्टकरी, दलित,आदिवासी, दुष्काळग्रस्त यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी संघर्ष करीत राहिलो. माझ्यासारख्या संघर्ष करणा-या कार्यकर्त्याला आमदार मानसिंग भाऊ नाईक यांनी तालुक्याच्या उपसभापती संधी दिली. त्या संधीचे रूपांतर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन

       आमदार नाईक यांच्या हस्ते उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल बी.के.नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई स्थित गणेश मंडळ, आण्णा भाऊ साठे मंडळ, चरण ग्रामस्थ, ग्रामपंचायत, मुस्लिम बांधव, महिला मंडळ व अन्य विविध घटकांतील मंडळाने व लोकानी नायकवडी यांचा नागरी सत्कार केला. यावेळी, भारत पाटील, सूर्यकांत घोलप, श्रीरंग नायकवडी, ज्ञानदेव नायकवडी यानी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी विश्वास साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र नायकवडी ,शामराव नायकवडी, उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव,पांडुरंग दाजी नेर्लेकर, माजी सरपंच सौ.सोनाली नायकवडी, भारत पाटील याच्यासह ग्रामस्थ, महिला, विविध संघटना मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार धर्मराज शिंगमोडे यानी मानले सुत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले. 


   चरण येथील १९६७ ते १९७२ या कालावधीत विष्णू केरू नायकवडी याना शिराळा पंचायत समितीच्या उपसभापती पदी संधी मिळाली होती. त्यानंतर तब्बल पन्नास वर्षानंतर चरण गावाला  बी.के.नायकवडी यांच्या रूपाने   उपसभापती पदी संधी मिळाली आहे.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 

. . . . . . . . . . . . . . . . . . .


 

Post a Comment

0 Comments