BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बोगस बियाणे विक्रीबाबत शासन कठोर पावले उचलणार- डॉ. विश्वजीत कदम_*

 

मुंबई ,ता.०३ :राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत शासन स्तरावरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबधीत कंपन्यावर गुन्हे दाखल केले जातील असे आज मंत्रालयीन दालनात पार पडलेल्या बैठकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले.

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या रब्बी हंगामात “प्रदिप सेल्स, मेन्टा रोड जालना” या कंपनीमार्फत माहे सप्टेंबर, २०२० कालावधीत जिल्ह्यात जवळ पास ८ टन कांदा बियाणे हजारो शेतकऱ्यांनी खरेदी केले होते.  मात्र  सदर कांदा बियाण्यांची उगवण न झाल्याने सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर  शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आतोनात नुकसान झाले होते. 

या बाबतची माहिती निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी डॉ. कदम यांच्याकडे केली होती यांची दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांचेसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी बोलतांना कृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले की, शेतकऱ्यांना  गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या मध्ये जर विविध प्रकारच्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असेल तर कृषी विभागाच्या वतीने यावर कठोर निर्णय घेऊन  शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच सातारा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्री बाबत सविस्तर माहिती आयुक्त कृषी यांनी घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी सूचना केली.

यावेळी या बैठकीला कृषी सचिव श्री.एकनाथ डवले तसेच सह सचिव, (कृषि) श्री.वी.बी पाटील,  संचालक कृषी ( निविष्ठा व गुणनियंत्रण) श्री.दिलीप झेंडे, अवर सचिव, श्री. उमेश आहिर तसेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी श्री.विराज शिंदे, संभाजी भोईटे राजेंद्र कदम, विद्याधर धुमाळ आदी सह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

विटयाला देशात फाईव्ह स्टार रँकिंग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू आहे महाश्रमदान आणि राबतात हजारो हात

------------------------------------------------------------------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 





Post a Comment

0 Comments