BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पांडुरंगचे डॉ.यशवंत कुलकर्णी यांना वसंतदादा शुगर इन्स्टीटयुटचा '' बेस्ट कार्यकारी संचालक'' पुरस्कार जाहीर

 


शिराळा : गळीत हंगाम 2019-20 सह मागील दोन हंगामा मध्ये श्री पांडुरंग सहकारीने अकौंट, शेती, इंजीनिअरिंग, रसायन, डिस्टीलरी, को-जन इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना यावर्षीचा बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून  वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी बु. पुणे यांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

सदर पुरस्काराचे वितरण  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व मंत्रीगण यांच्या  उपस्थितीत देण्यात येणार आहे. वसंतदादा  ही संस्था ऊस क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना प्रत्येक वर्षी बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून सन्मान करीत असते.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही साखर कारखान्यांच्या कार्याचा विचार करुन पुरस्कार दिला जातो.

  डॉ यशवंत कुलकर्णी यांनी कार्यकारी संचालक पदाचा   पदभार स्विकारलेपासून  सुयोग्य अर्थिक नियोजनामुळे आजपर्यंत कारखान्यास सतत 'अ' वर्ग प्राप्त झालेला आहे.

कारखान्याने राबविलेल्या योजना मध्ये साखरेची गुणवत्ता व इकुमसा राखण्यासाठी जर्मन मेड स्क्रु पंपाचा व मेकॅनिकल सर्क्युलेटर्सचा वापर केला आहे, साखरेची सुयोग्य रितीने विक्री व्हावी याकरिता भारतातील साखर व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजीत केला होता. सुपंत ब्रॅन्ड या नावाने   पॉलीपॅकमध्ये साखर विक्री सुरू केली आहे, मॉईच्यर रिडक्शन सिस्टीमद्वारे बगॅसमधील पाण्याचे प्रमाण कमी केल्यामुळे 2 टक्के बगॅस बचत व बॉयलरच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ यामुळे विज निर्मीती व आसवनी प्रकल्पाकरिता अधिकचा बगॅस उपलब्ध झाला आहे.

 प्लॅनिटरी गिअर बॉक्सेसद्वारे विज बचत, देखभाल व मनुष्यबळ खर्चामध्ये बचत झाली आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, सुपंत सौरऊर्जा नावाने  कारखान्याच्या गोडावून छतावरती सोलर पॅनल बसवून 80 kwp सौरऊर्जा प्रकल्प सुरु केला आहे.

  माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा सुरु करुन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रवाहामध्ये आणले आहे.

  सुपंत बॉयोफल्टीलायझर्स ही जीवाणु खत निर्मीती सुरु केली आहे.  पांडुरंग भुषण व पांडुरंग आदर्श शेतकरी हे पुरस्कार सुरु केले आहे.

 6 वर्षात 130 कोटी एवढया कर्जाची परतफेड केली आहे.

 वाहनांना व्हेईकल ट्रॅकींग डिवायसेस बसविली असून त्याद्वारे अचुक वाहतुक बिले दिली जात आहेत.  पेट्रोल व डिझेल पंपाद्वारे संस्थेस दरवर्षी 60 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे.

  पाणी बचतीसाठी सीपीयु सिस्टीम बसवून 7 ते 8 लाख लिटर दररोज पाण्याची बचत केली आहे. 

 रेनवॉटर हार्वेस्टींग द्वारे पावसाळयात 1 कोटी लिटर पाण्याची साठवण केली आहे. सी सी टीव्ही कॅमेराद्वारे प्रशासकीय कार्यालय, डिझेल पंप, गोडावून, इंजीनिअरिंग विभाग, मॅन्युफॅक्चरिंग विभाग, कोजनरेशन,डिस्टीलरी, पंढरपूर कार्यालय येथे बसविलेमुळे कामगारांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वितरण, शेतकऱ्यांना कमी दरात साखर वाटप करणेसाठी ऊस नोंदणी खाते पुस्तकाची माहिती खत वितरण यासाठी केला जात आहे. सुपंत मोबाईलमधून ऊस नोंदीघेणे, ऊस वजन पावती फाडणे , शेतकऱ्यांना खताचे वाटप करणे, शेतकऱ्यांना आलेल्या ऊसा संबंधी सर्व माहिती पुरविणे इत्यादी सर्व कामे स्मार्ट कार्ड द्वारे केली आहे. 

शेती विभागातील कर्मचारी यांना संदेशाची देवाण घेवाण करता यावी म्हणून ग्रुप मोबाईल सिस्टीम , वाकी टॉकी, वॉयरलेस सिस्टीम इत्यादीची उभारणी केली आहे. 

 कारखान्याकडे येणाऱ्या ऊसाची, बिलींगची, वहातुक ठेकेदार, तोडणी ठेकेदार, याची माहिती एस.एम.एस द्वारे उपलब्ध करुन दिली आहे. 

 कारखान्यामध्ये अंतर्गत रस्ते, कारखाना परिसर कामगार कॉलनी, प्रशासकीय इमारत, यामध्ये शोभिवंत वृक्षारोपण केले आहे  अधिकारी व कर्मचारी यांना ड्रेसकोड, हेलमेट, बुट, हॅन्डग्लोज इ. ची व्यवस्था केली आहे.  कामगारांच्या व सभासद शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व्यायामशाळा, संगित व कला अकादमीची उभारणी.

      कारखान्याने या हंगामात तांत्रीक बाबतीत खालीलप्रमाणे उल्लेखनीय कार्य केले आहे.

गाळप क्षमतेचा वापर :-  

    कारखान्याने ऊसाचे गाळप, क्षमतेच्या 106.40 टक्के इतके केले आहे.   वाया जाणारे साखरेचे प्रमाण :- 

बगॅस, प्रेसमड, मळी इत्यादी घटकामधून वाया जाणारे साखरेचे प्रमाण 1.75 बी हेवी सह टक्के . मिलहाऊसची कार्यक्षमता :-  

      कारखान्यामधील मिलहाऊसमध्ये लागणारे योग्य ते बदल केलेने मिलच्या कार्यक्षमतेत वाढ होवून रिडयुस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 96.06 टक्के इतके मिळाले आहे.

 बॉयलिंग हाऊस कार्यक्षमता :- 

       बॉयलिंग हाऊसमध्ये क्लॅरिफिकेशन, पॅन व सेंट्रीफयुगल विभागामध्ये आधुनिकीकरण केल्याने रिडयुस्ड बॉयलिंग      

       हाऊस रिकव्हरी  90.67  टक्के     स्टीमचा वापर :-

       कारखान्याने प्रोसेससाठी लागणाऱ्या स्टीमचा वापर 39.50 टक्के इतका केला आहे.  

 बंद वेळ :- 

    कारखान्याने मशिनरीची देखभाल योग्य रितीने व ऊस पुरवठा अखंड झालेने बंद वेळेचे प्रमाण 1.82 टक्के  इतके आहे. 

   साखरेचा दर्जा  :-  

      हंगाम 2019-20 मध्ये उत्पादित झालेल्या साखरेमध्ये एम-30 चे प्रमाण 66 टक्के, सुपर एस-30 चे प्रमाण  59     टक्के आहे. 

  कारखाना सांडपाणी प्रक्रिया प्लॅन्ट व इतर :- 

     महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या तत्वानुसार कारखान्यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. तसेच बॉयलरसाठी ईएसपी ही अत्याधुनिक यंत्रणा कारखान्याने उभारलेली आहे. 

    पाणी व वीज बचत  :-  

      साखर कारखान्यामध्ये पाण्याचा कमीत कमी  वापर केला जातो. तसेच कारखान्यामधील वाफेचे जादा गरम पाणी कुलिंग टॉवरद्वारे थंड करुन त्याचा पुनर्वापर केला जातो. कारखान्याने सहविज निर्मीती प्रकल्प, मिलहाऊस, बॉयलर हाऊस व बॉयलिंग हाऊसमध्ये ऍ़टोेमेशन केलेले आहे. त्यामुळे कारखान्यास लागणाऱ्या वीजेमध्ये बरीचशी बचत झालेली आहे. 

 सहवीज निर्मीती प्रकल्प :- 

     या प्रकल्पामध्ये कारखान्याने बॉयलरसाठी इंधन म्हणून ऊस तोडणी नंतर वाया जाणाऱ्या पाचटाचा उपयोग करुन बगॅसची बचत केलेली आहे.

गळीत हंगाम 2019-20 मध्ये याप्रमाणे उल्लेखनीय कार्य केल्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरवण्यात येत आहे. त्याच बरोबर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पामध्ये उत्कृष्ट काम केलेबद्दल आसवनी प्रमुख सय्यदनूर  शेख यांना बेस्ट डिस्टलरी मॅनेजर हा पुरस्कार तर  कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी जयसिंगराव दाजी भुसनर शिरढोण यांना बेस्ट ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. सदर पुरस्कार जाहीर झालेबद्दल कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकणी यांचे  चेअरमन आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा.चेअरमन वसंत देशमुख, संचालक मंडळ, कामगार युनियन यांनी अभिनंदन केले आहे.

शिराळच्या सुपुत्राचा सन्मान

यशवंतराव कुलकर्णी हे शिराळा तालुक्यातील नाटोली गावचे सुपुत्र.त्यांनी विश्वास कारखाना येथे अकौंटंट म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी शिराळा येथे मृणाल इंडस्ट्रीजची उभारणी केली.दत्तकृपा कन्सट्रक्शन मृणाल फार्मस् निर्मिती करून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा शिराळा तालुक्याच्या लौकिकात भर घालणारा आहे.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


           



Post a Comment

0 Comments