BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सहकारी जगतच्या आठ दशके कृतज्ञतेचे या मासिकाच्या विशेषांकाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन


 इस्लामपूर: देशाच्या राजकीय,सामाजिक, साहित्यिक, क्रीडा, सांस्कृतिक विश्वात आख्यायिका बनलेल्या शरद पवार साहेब यांच्या 80 व्यां वाढदिवसा निमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार संघाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या  सहकारी जगत च्या आठ दशके कृतज्ञतेचे या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील हे उपस्थित होते. गेली 75 वर्ष  सहकार या विषयावर प्रकाशित होणाऱ्या, सहकारी जगतचे संपादक म्हणून डॉ. प्रताप पाटील हे कार्यरत असून सहकारातील विविध विषयांची हाताळणी या अंकामधून होते. यावर्षी मा. शरद चंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांचे, राष्ट्रीय नेत्यांचे विविध लेख या सहकारी जगत मधून प्रकाशित करण्यात आले आहेत.  विशेषांकाचे प्रकाशन सोहळा कराडमध्ये संपन्न झाला.

      यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब यांनी शरद पवार यांच्या बरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले पन्नासहून अधिक वर्षांपासून शरद पवार राजकारणात आहेत, त्यांनी भूषविलेल्या प्रत्येक पदावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान आहे ते केवळ त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर. विशेष अंकामध्ये शरद पवार साहेब यांच्या व्यक्तिमत्वावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रफुल्ल पटेल सुप्रिया सुळे,अजित पवार, जयंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, मधुकर भावे, दिलीप वळसे पाटील, सरोज पाटील, राजदीप सरदेसाई यांचे लेख या सरकारी जगत मध्ये घेण्यात आले आहेत.यावेळी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाच्या संचालक पदी निवड झालेले साताऱ्याचे राजेंद्र लवांगरे यांचा सत्कार  श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ सुरज चौगुले यांनी केले कार्यक्रमासाठी वारणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाबासो पाटील, महिला महाविद्यालय कराडचे प्राचार्य एच. वाय. करांडे  विश्वस्त सयाजी पाटील, आप्पासो खराडे, जगन्नाथ पाटील, शेतकरी दूध संस्थेचे संचालक सुभाष पाटील, पंढरीनाथ पाटील, बुद्धी विकास वाचनालयाचे अध्यक्ष बी.बी. पाटील, मानद सचिव सर्जेराव माने , विठ्ठल गणेश मंडळाचे अध्यक्ष बी.  के पाटील, वारणा पाणीपुरवठ्याचे संचालक जयसिंग पवार,  मुकुंद आवटे, टी. एस.पाटील, प्रकाश पाटील, पैलवान संभाजी पाटील पैलवान किरण गायकवाड,   प्रा.सुभाष मधाले, अभिजीत चौगुले , आनंदा पाढरबळे,अरविंद पाटील,  आदी मान्यवर उपस्थित होते,

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


Post a Comment

0 Comments