शिराळा, ता.७: पणूंब्रे वारुण ता.शिराळा येथे वीरगळ स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तालुक्यात पहिल्यांदा वीरगळ स्मारक उभारण्यात आले असल्याने श्री शिवप्रतिष्ठाण मंडळाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी वीरगळ अभ्यासक वैभव साळुंखे- पाटील, विनोद निंबाळकर ,माजी सभापती हणमंतराव पाटील उपस्थित होते.
शिराळा तालुक्यामध्ये सापडणारे वीरगळ प्राचीन गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.पण काळाच्या ओघात या वीरगळांच महत्व कमी झालं आणि त्यांची दुरवस्था झाली.
असेच दुरावस्थेमध्ये असणारे वीरगळ पणूंब्रे वारूण मधील युवकांनी संवर्धित करण्याचा विडा उचलला.श्री शिवप्रतिष्ठाण मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्णत्वास नेले.सुरवातीला गावातील लोकांना वीरगळ म्हणजे काय हेच माहित नव्हते. त्यासाठी सामाजिक माध्यमांचा योग्य तो वापर करून संपूर्ण गावामध्ये जनजागृती केली.लोकांना वीरगळांचे महत्व पटल्यानंतर ,महादेव मंदिर परिसरातील वीरगळ संवर्धनाला सुरवात केली.लागोपाठ तीन संवर्धन मोहिमा घेऊन वीरगळ परिसर स्वच्छ केला. त्यानंतर स्मारक उभारण्याला सुरवात केली.स्मारक उभारणीसाठी लागणार निधी श्री शिवप्रतिष्ठाण कला ,क्रिडा ,सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाने दिला.
यावेळी वैभव साळुंखे -पाटील म्हणाले, वीरगळ स्मारक गावोगावी उभा राहावी आणि त्यातून पूर्वजांचा पराक्रम जपला जावा.
विनोद निंबाळकर म्हणले, वीरगळ हे आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देत असतात.त्यांचे जतन आणि संवर्धन व जनजागृतीची गरज आहे. अमित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आभार शिवाजी पाटील यांनी मानले.
शिराळ्यात पहिलं वीरगळ स्मारक पणूंब्रे वारुण येथे उभा राहिलंय,हि सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.भेट देणाऱ्या सर्वांचे स्वागतच राहिल,अशीच स्मारके गावोगावी उभारायला हवीत,जेणेकरून येणाऱ्या पिढयांना गावचा इतिहास समजेल.
-विनायक पाटील(वीरगळ अभ्यासक)
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
.
0 Comments