BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फत्तेसिंगराव नाईक यांचा पुतळा हा नव्या पिढीत चेतना निर्माण करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करेल-खासदार शरद पवार.


 चिखली( ता.शिराळा) येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्या प्रसंगी खासदार शरद पवार,मंत्री जयंतराव पाटील, आमदार  मानसिगराव नाईक, मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशिल माने,  माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम,माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूणअण्णा लाड, बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील,सत्यजीत देशमुख, विराज नाईक



शिराळा, ता.२२: साखर उद्योगावर आधारित प्रकल्प उभे करायला हवेतच पण मानसिंगराव  आता कारखाण्यात इथेनॉल व अल्कोहोल बरोबर  सी.एन.जी.गॅस  तयार करण्याचा प्रकल्प हाती घ्या. नवीन व्यवसायिक दालने सुरू करा लागेल ती मदत करू असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.

चिखली (ता.शिराळा ) येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्या प्रसंगी बोलत होते.



यावेळी पवार म्हणाले,  कारखान्या मार्फत सी.एन.जी.ची निर्मिती झाल्यास कमी दरात लोकांना घरोघरी गॅस मिळू लागल्यास त्यांचे पैसे वाचतील. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व मानून शब्दाला जगण्याची भूमिका या तालुक्यातील लोकांची आहे. बिळाशीचे बंड व शिराळचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. तत्वाशी तडजोड न करणे व  लाचारी न स्वीकारणे हा इथला इतिहास आहे. फत्तेसिंगराव नाईक यांचा पुतळा हा नव्या पिढीत चेतना निर्माण करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करेल.



मंत्री जयंतराव पाटील म्हणाले, उत्तर भागाच्या पाण्याच्या प्रश्नाचे अप्पांचे असणारे स्वप्न वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून या दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण झालेले दिसून येईल.मितभाषी व सर्वाना बरोबर घेऊन जाणाऱ्या अप्पांचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल.मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नातून चांदोली पर्यटनास लवकरच गती मिळेल.

शिवाजीराव नाईक म्हणाले, डोंगरी विभागासाठी अप्पानी केलेले काम दिशादर्शक आहे. आपल्या सानिध्यात आलेल्या लोकांना ते कायम साथ देत असत. निवडणूकीकडे  राजकारणात पुरे पाहून नंतर सर्वांगीण विकासासाठी झटणारे अप्पांचे नेतृत्व होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येणे गरजेचे.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अप्पांच्या कार्याची प्रचिती व त्यांनी आम्हाला दिलेला विश्वास न विसरण्यासारखा आहे. शिराळा, वाळवा व कराड तालुक्याच्या पाण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, अप्पांनी शेतीच्या पाण्याचा ध्यास घेऊन काम केल्याने या तालुक्यातील शेतकरी सुखी समृद्ध होत आहे. उत्तर भागाला पाणी मिळण्याचे स्वप्न जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होईल.

स्वागत  विराज नाईक व प्रास्ताविक आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार  धैर्यशिल माने, माजी मंत्री  अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख,अमरसिंह नाईक,राजेंद्रसिंह नाईक, साम्राटसिंह नाईक,  विवेक नाईक,ऍड भगतसिंग नाईक,सुनीतदेवी नाईक,नगराध्यक्षा सुनीता निकम, दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे, विष्णू पाटील, विश्वास कदम,  विजयराव नलवडे, शिराळा  पंचायत समिती  सभापती वैशाली माने, उपसभापती बाळासाहेब नायकवडी,सर्व संचालक, नाईक कुटुंबातील सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मानले.ार बाबासाहेब पाटील यांनी मानले.



महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


       



Post a Comment

0 Comments