शिराळा: जेष्ठ कलाकारांचा सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती वैशाली माने उपसभापती बी.के.नायकवडी, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, जिल्हापरिषद सदस्या अश्विनी नाईक,गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल
शिराळा, ता.२३: सांगली जिल्हा वृद्ध कलाकार मानधन समितीने मानधन मंजूर केलेल्या , शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करून त्यांना मानधन मंजुरी पत्र देण्यात आले.
शिराळा पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. केला.यावेळी शिराळा तालुक्यातील ज्येष्ठ कलाकारांनी आपली कला सादर केली. वाकुर्डे बुद्रुकचे पंचरंगी कलाकार प्रकाश सोनवणे आणि जगन्नाथ सोनवणे यांनी स्वागत केले. शाहीर मारुती शिंदे, शिंदेवाडी यांनी सहकार्यांसह कोरोनावरील पोवाडा सादर केला. भीमराव झेंडे ,पाचुंब्री यांनी अभंग गायनाने सभागृह मंत्रमुग्ध केले. सहदेव कुंभार यांनी गोंधळ कला सादर केली.
जेष्ठ तमाशा कलावंत बाबुराव वाकुर्डेकर यांनी तमाशा कलेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आमदार नाईक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावर्षीचे २०२०- २१ चे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत पाठवले जातील .जास्तीत जास्त कलाकारांनी आपले प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन उपसभापती बाळासाठी नायकवडी यांनी केले आहे. जिल्हा मानधन समितीचे सदस्य अनंत सपकाळ यांनी तालुक्यातील ज्येष्ठ कलाकारांना मानधन मिळवून दिल्याने, आमदार नाईक यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
शिराळा पंचायत समितीच्या सभापती वैशाली माने, उपसभापती बाळासाहेब नायकवडी , माजी सभापती सम्राटसिंह नाईक, जि.प.सदस्या अश्र्विनी नाईक ,गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सहायक गटविकास अधिकारी ए. एस . माने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील , माजी सभापती मायावती कांबळे, संगीता गुरव,, सारिका पाटील उपस्थित होते.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments