BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार

शिराळा ,ता.२१: आज २२ जानेवारीस लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक यांचे विश्वास कारखाना स्थळावर उभारलेल्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. ही माहिती अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

यावेळी नाईक म्हणाले, आज जानेवारीस लोकनेते स्व. फत्तेसिंगअप्पांची व आई स्व. लीलावती नाईक यांची पुण्यतिथी आहे. या औचित्याने शिराळा विधानसभा मतदार संघ व शाहूवाडी तालुक्याच्या विकासासाठी भगिरथ प्रयत्न करणार्‍या अप्पांच्या स्मृति चिरंतन जतन व्हाव्या म्हणून कारखाना कार्यस्थळावर त्याचे स्मृतीस्थळ व पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्व. अप्पांचे संपुर्ण जीवन संघर्षात गेले. हा संघर्ष होता, सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रगतीसाठीचा. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मात करत मोठा संघर्ष केला. विश्वास कारखाण्यास, दोन्ही तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांत बळ बळ निर्माण केले. शिराळा व शाहूवाडी तालुक्याला विविध पाणी योजना राबवून पाणी दिले. शिराळा तालुक्यातील उत्तर विभागासाठी वाकुर्डे योजनेचे संकल्पना मांडून त्याचा शासन दरबारी पाठपुरावा केला. एकूणच लोकनेते स्व. अप्पांचे जीवन सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी समर्पित होते. त्यांनी शेती, सहकार, उद्योग, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व कष्टकरी, शेतकरी व समाजाच्या तळागाळापर्यंत राबणार्‍या हातासाठी केलेल्या कामाची हे स्फूर्तिस्थळ आपणास चिरंतन प्रेरणा देत राहील. 

म्हणूनच हा समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. पवारसाहेब यांच्या हस्ते होणार आहे.

 यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार  धैर्यशिल माने, माजी मंत्री  अण्णासाहेब डांगे, आमदार मोहनराव कदम, माजी खासदार  राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, आमदार अरूणअण्णा लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजीत पाटील ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सत्यजीत देशमुख प्रमुख उपस्थित असणार आहेत. 

हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता कारखाना कार्यस्थळावर चिखली येथे संपन्न होईल. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील असलेल्या शिराळा, शाहुवाडी तसेच वाळवा तालुक्यातील लोकांनी उपस्थित रहावे. खासकरून लोकनेते स्व. फत्तसिंगराव नाईक यांचे सहकारी, त्यांच्यावर प्रेम करणारे, कारखान्याचे निवृत्त कर्मचारी शिवाय ज्या लोकांना अप्पांचा सहवास, त्यांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली त्यांनी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 .


       



Post a Comment

0 Comments