शिरशी (ता.शिराळा ) येथे जिल्हापरिषद शाळा नवीन खोल्या बांधकाम,व एस.टी.गल्ली,शिरशी येथील गटार काम भमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हापरिषद सदस्या सौ.आशा झिमुर सोबत विजय झिमुर, सरपंच एम.बी.भोसले
शिराळा, ता.२३: ज्या शाळेत शिकले त्याच शाळेचा कायापालट करण्याचे भाग्य मला मिळाले असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषद सदस्या सौ.आशाताई झिमुर यांनी केले.
शिरशी (ता.शिराळा ) येथे जिल्हापरिषद शाळा नवीन खोल्या बांधकाम,व एस.टी.गल्ली,शिरशी येथील गटार काम भमिपूजन प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच एम.बी.भोसले होते.यावेळी झिमुर म्हणाल्या, सर्वसामान्य लोकांच्या मुलांचे ज्ञानमंदिर म्हणजे जिल्हापरिषद शाळा असते.त्यांच्या शिक्षणाचा पाया येथेच मजबूत होत असतो. त्यामुळे ही ज्ञानमंदिरे व्यवस्थित असणे गरजेचे. ज्या शाळेत मी शिकले त्याच शाळेला कायापालट माझ्या हातून होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.
स्वागत व प्रास्ताविक विजय झिमुर यांनी केले.
कार्यक्रमास सरपंच एम.बी.भोसले,उपसरपंच सर्जेराव महिंद, मुख्याध्यापक दिनकर पाटील,ग्रापंचायत सदस्य सुरेश महिंद, लक्ष्मी गायकवाड,अनिता माने, ग्रामसेवक प्रसाद पाटील, संजय महिंद,आनंदा महिंद ,उत्तम दंडवते,पोपट गवळी, संजय महिंद,वसंत घाटके,आनंदा भोसले,अशोक यादव, जगन्नाथ महिंद,वनीता शेवाळे,बापू जाधव ,उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक दिनकर पाटील यांनी मानले.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments