BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आमच्या लेकीला न्याय द्या;नराधमाला फाशी द्या,

शिराळा:देववाडी ( ता. शिराळा )येथील विवाहिता रूपाली खोत हिच्या खुन्यास कठोरात कठोर शासन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने शिराळा तहसील कार्यालयावर  काढलेल्या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या महिला.

 शिराळा,ता.२५: आमच्या लेकीला न्याय द्या;नराधमाला फाशी द्या,अशा घोषणा देत हजारावर लोकांनी शिराळा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

देववाडी ( ता. शिराळा )येथील विवाहिता रूपाली खोत हिच्या खुन्यास कठोरात कठोर शासन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने शिराळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या मोर्चास सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला.

या मोर्चाची सुरुवात लक्ष्मी चौक येथे होऊन  मोर्चा कापरी नाका, शिराळा बस स्थानक मार्गे तहसील कार्यालय येथे आला. यावेळी या मोर्चात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. आमच्या लेकीला न्याय द्या,नराधमाला फाशी द्या अशा घोषणा महिला देत होत्या.  .त्यामुळे शिराळा परिसर या घोषणाने दुमदुमत होता. मोटरसायकर घेऊन तरुण ही सहभागी झाले होते

तहसील कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी  ग्रामस्थांच्यावतीने प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अरोशी  सिंग यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले ,शक्ती कायद्यांतर्गत आरोपीला शिक्षा होईलच पण तपास कामासाठी पोलिसांना लोकांनी संयम पाळून सहकार्य करावे.  पोलिसांनी या घटनेचा तपास  कसून करून पीडित महिलेच्या कुटुंबाला न्याय द्यावा.

माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, लोकांच्या तीव्र भावनांचा विचार करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.

डॉ. उषाताई दशवंत म्हणाल्या, या मुलांची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्याची गरज आहे. 

अँड. रवी पाटील म्हणाले ,या काळींबा फासणाऱ्या  घटनेतील संशयित आरोपीचे वकील पत्र शिराळा बार असोसिएशनचे वकील  घेणार नाहीत.

रेखा खोत म्हणाल्या, या संशयित आरोपी कडून यापूर्वी झालेल्या वर्तनाबद्दल  महिलांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार देण्याची गरज आहे. 

तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, या घटनेचा पोलिसांमार्फत खोलात जाऊन तपास करण्याचे काम चालू आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. निवेदनानुसार आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न केले जातील.

     यावेळी सरपंच संजना वरेकर , रेखा खोत, संगीता साळुंखे, ऍड. रवी पाटील ,जि.प. सदस्य संपतराव देशमुख, शेतकरी संघटनेचे राम पाटील ,भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार आरुषी सिंग,  तहसीलदार गणेश शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक  विशाल पाटील,जिल्हापरिषद सदस्य संपतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कदम, जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक, रणजीतसिंह नाईक, नगरसेवक केदार नलवडे ,पंचायत समिती सभापती वैशाली माने, माजी सभापती सम्राटसिंह नाईक,  विराज नाईक, प्रहार संघटनेचे श्रीराम नागरे  व देववाडीचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. 

प्रमुख मागण्या

सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. यासाठी कायदेशीर सल्लागार अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी.  पिढीत कुटुंबाला आर्थिक मदत किंवा उपजीविकेचे साधन मिळवून द्यावे. मुलांना शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळावी.या मागण्या  निवेदनात करण्यात आल्या आहेत.

महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक अप्पा पुतळा अनावरण सोहळा



कहर मराठी शॉर्टफिल्म



व्रण मराठी शॉर्ट फिल्म


 



मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇

👇



कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया

👇



टमरेल

👇


फ्रेंड

👇





शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
-------------------

असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह

----------------------------------
------------------------------
------------------
------------------------------------------------------
----------------------------------
-----------------------------------

म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले


-------------------------

त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्

 शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च 

------------------------

विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश

 बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन

---------------------------------

पुनवतच्या   जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

------------------------

त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार

---------------------


यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात

शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण

----------------------------

व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम



चांदोली धरण १०० टक्के भरले 


 





Post a Comment

0 Comments