सांगली: सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गौरविताना पालकमंत्री जयंतराव पाटील व इतर मान्यवर. |
शिराळा,ता.२७: येथील पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रजासत्ताक दिनी सांगली येथे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीसप्रमुख दिक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
विशाल पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यात मांगले गावात झालेल्या घरफोडी चोरीतील मुद्देमाल व आरोपी दोन दिवसात पकडून या गुन्ह्याचा छडा लागला होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विशाल पाटील यांनी यापूर्वी देखील शिराळा पोलिस स्टेशनचे हद्दीत घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास व उलघडा कौशल्यपूर्ण रीतीने केला आहे. गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणेसाठी ते स्वतः प्रयत्न करून शिस्त लावण्यासाठी आग्रही असतात. कोरोणा काळात देखील त्यांनी समन्वयातून केलेले काम अतिशय उत्कृष्ट होते.
या सगळ्याची पोहोच पावती म्हणून नुकतेच त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सांगली येथे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. पोलिस कॉन्स्टेबल अभिजित पवार, कालिदास गावडे, चंद्रकांत कांबळे, विनोद जाधव, नितीन यादव, अरुण कानडे, स्नेहल कुंभार यांना देखील या कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामुळे शिराळा परिसरातून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
असा झाला युवानेते विराज नाईक व डॉ.शिमोनी यांचा विवाह
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
म्हणून त्याने बिबट्याला काठीने धोपटले
-------------------------
त्या तीन दिवसाच्या बालकास शेतात पुरले अन्
--------------------
------------------------
शिराळा एसटी स्टँड ते शिवपुतळा कॅन्डल मार्च
------------------------
विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील सुरेश
बाबुराव बारपटे(बापू) यांचे निधन
---------------------------------
पुनवतच्या जवान नानाश्री मानेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
------------------------
त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार
---------------------
यासाठी ते जातात त्या जमिनींना २५ टक्के जास्त मोबदला मिळवून देणार उंच ठिकाणी व शेतात
------------------------------------------------------------------–----
शिराळा तालुक्यातील १४ गावात ३५ रुग्ण
----------------------------
व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत कविता पाटील प्रथम
चांदोली धरण १०० टक्के भरले
0 Comments