शिराळा येथील दत्त मंदिर ते मुलानी गल्ली पर्यंत तोरणा ओढ्यालागत संरक्षक भिंत बांधकामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करताना आमदार मानसिंगराव नाईक. शेजारी इतर मान्यवर. |
शिराळा: संरक्षक भिंत बांधकामामुळे तोरणा ओढ्याच्या सौंदर्यात भर पडेल, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील दत्त मंदिर ते मुलानी गल्ली पर्यंत तोरणा ओढ्यालागत संरक्षक भिंत बांधकामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. 'विश्वास'चे संचालक विश्वास कदम व संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष संपतराव शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, आजपर्यंत शिराळ्यातील नागरिकांनी मागितलेली सर्व कामे पूर्ण केली आहेत. तालुक्याचे ठिकाण सर्व सोईनियुक्त असावे यासाठी जी जी आवश्यक विकास कामे करावी लागत आहेत ती कामे केली वा केली जात आहेत. विविध प्रकारच्या योजनेतून आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा विकास निधी शिराळ्याला दिला आहे. पाणी योजना, प्रत्यक्ष नागरी वस्तीत दिवा बत्तीची सोय, अंतर्गत सर्व रस्ते, उप जिल्हा रुग्णालय, बस स्थानक इमारत, अंबामाता व गोरक्षनाथ मंदिर, सल्लाहउद्दीन दर्गा सुशोभीकरण आदी कामाची मलिक उभारली आहे. अजून ज्या विकास कामांची मागणी येईल, ती पण करू.
प्रारंभी नगरसेवक संजय हिरवडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आमदार नाईक यांनी श्रीफळ फोडून दत्त मंदिर ते मुलानी गल्ली पर्यंत तोरणा ओढ्यालागत संरक्षक भिंत बांधकामाचा शुभारंभ केला. नगरपंचायती मार्फत मान्यवरांचा सत्कार झाला. या कामासाठी नगरपंचायत निधीतून १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही माहिती नगराध्यक्ष सुनीता निकम यांनी दिली. यावेळी नगरसेवक किर्तीकुमार पाटील, सुनंदा सोनटक्के, मोहन जिरंगे, पृथ्वीसिंग नाईक, राजसिंह पाटील, के. वाय. मुल्ला, वाशीम मोमीन, राजू निकम, चंद्रकांत जाधव, सुनील कवठेकर, वैभव हसबनिस, सुनील कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, कुलदीप निकम, अविनाश जाधव प्रताप कदम,आदी उपस्थित होते. संतोष देशपांडे यांनी आभार मानले.
महत्वच्या बातम्या व शॉर्ट फिल्म
कहर मराठी शॉर्टफिल्म
व्रण मराठी शॉर्ट फिल्म
0 Comments