आम्ही दहावीला १९९० साली होतो. त्यावेळी हाप खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट हा आमचा शाळेचा युनिफॉर्म होता. तीस वर्षाने पुनः त्याच शाळेत सूट बुटात एकत्र येण्याचा योग्य आमचे मित्र वसंत येसले( फौजी), शिवाजी भाष्टे व रणजित भुसारी व इतर सहकाऱ्यांनी आणला. आज सकाळी सर्व निमंत्रित मित्र आरळा येथे गोविंद नार्वेकर यांच्या घरी एकत्र आलो. त्यानंतर आमचे मित्र संजय सुतार यांचे वडील वारल्याने त्याला भेटून आलो. त्यानंतर सर्वजण गांधी सेवाधाम विद्यालय आरळा येथे आम्ही दहावीत असताना श्रमदानातून बांधलेल्या स्टेजवर एकत्रित आलो. त्यावेळी सर्वांच्या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. त्या ठिकाणी फोटो काढण्याचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर दिवंगत झालेले आमचे वर्गमित्र संतोष पोतदार,धनाजी भुसारी,पांडुरंग देशपांडे, राजाराम पाटील,भास्कर कोलते,शिवाजी राऊत,सदाशिव मांडवकर, रवींद्र गुरव,आनंद डिगे व आमचे मित्र किसन पोळ यांचे वडील बाळू पोळ,संजय सुतार यांचे वडील सदाशिव सुतार,संजय पाटील(मिस्त्री) यांच्या मातोश्री बनाबाई पाटील, संजय पाटील(इंजिनिअर) यांचे वडील गणपती पाटील व बंधू राजेश पाटील, आमचे शिक्षक चंद्रकांत भेडसगावकर सर यांच्या पत्नी रेखा भेडसगावकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
त्यानंतर या ग्रुप मार्फत सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करून प्रत्येकाने आपापली सध्याची ओळख करून दिली.
यावेळी गणपती मांडवकर (शिक्षक), धनंजय दळवी ( बँक अधिकारी),
सीताराम यादव(पेंटर),कृष्णा झाडे, उत्तम पाटील(शेतकरी), किसन पोळ(व्यावसायिक), वसंत येसले( फौजी), शिवाजी परुले ( मुंबई येथे नोकरी), रामचंद्र पाटील(खासगी नोकरी), मधुकर तुपारे(सोसायटी सचिव), अशोक कुंभार(व्यावसायिक),
तानाजी पाटील (खासगी नोकरी), गोविंद नार्वेकर(शिक्षक), सुनील शेळके ( खासगी नोकरी बँक), रवी चौगुले(व्यवसाय), शिवाजी भाष्टे (व्यवसाय), रणजित भुसारी(व्यवसाय), हणमंत कुंभार(नोकरी), संजय पाटील (इंजिनिअर), मारुती पाटील(शेती),संजय जोशी(शेती), भाऊसो चव्हाण( टॅक्स कन्सल्टंट),
सूर्यकांत पाटील(इंजिनिअर), कृष्णात राक्षे(व्यवसाय), शिवाजीराव चौगुले(पत्रकार),सुनील शेट्टी(व्यवसायिक) उपस्थित होते.
बातम्या वाचा
मराठी शॉर्ट फिल्म पहा
मुक्त मराठी शॉर्ट फिल्म👇
👇
कानावर मोबाईल अन् एकटचं हसतया
👇
टमरेल
👇
फ्रेंड
👇
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
0 Comments