BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अन् पेपर टाकणारं पोर जेव्हा तहसीलदार बनतं-----

ब्रेकिंग न्यूज

कोयना धरण

सध्या कोयना धरणातून सकाळी 8.30 वाजले पासून  25604  क्युसेक्स पाण्याचा  विसर्ग चालू आहे. त्यात वाढ करून आज सकाळी 11.00 वाजले पासून कोयना धरणातून एकूण 35000 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2.00 वाजता एकूण विसर्ग 40000 क्युसेक्स करण्यात येईल.  कोयना व कृष्णा नदीकाठच्या  सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी

वारणा धरण

वारणा धरण परिसरात पाउस पडत असून पावसाचा जोर वाढला आहे.त्यामुळे आज दि. 16/8/2020 रोजी  सकाळी 10.00 वाजता 11599 क्युसेक्स सांडव्यावरुन ,पाॅवर हाउस येथून 1385 असा एकूण 12984 क्युसेक्स इतका विसर्ग  नदीपात्रात  सोडण्यात येत होता., तो आता वाढवून 13101 सांडव्या वरुन  व पाॅवर हाउस येथून 1385 असा एकूण 14395 इतका विसर्ग वारणा नदीपात्रात सोडणेत येणार आहे.                                   

                 टी.एस.धामणकर
                    शाखाधिकारी
              वारणा पाटबंधारे शाखा
                      वारणावती

      जिवन हे संघर्षमय असत असं म्हणतात पण इतकं असतं याची जाणीव या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यावर होते....
         सुरवात कुठून करायची हेच कळत नाही...घरची परिस्थिती जेमतेमच..आई वडील शेतकरी २बहिणी १ भाऊ असा परिवार त्यातील जेष्ठ म्हणून जन्म झाला...संघर्ष हा काय पाचवीलाच पुजला होता की काय पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आलाच त्याने काही पाठ सोडली नाही(अगदी लग्न करण्यासाठी पण)...

        जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं...  या दरम्यान पेपर टाकायचं काम करायला ही लाज वाटली नाही. हे ही केलं  कारण शिक्षणाला थोडा हातभार... असं करत माध्यमिक शिक्षण ही पूर्ण झाले.आणि सुरवात झाली खऱ्या आयुष्याची...
      १२ वी विज्ञान शाखेत गणित या ग्रुप ला 80 %मार्क्स मिळाले.त्यावेळी इंजिनिअरिंग, मेडिकल आणि नाही जमलं तर मग डी. एड असा पर्याय समोर होता.चांगले मार्क्स होते. म्हणून इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचं नक्की केलं. सरकारी कॉलेजला प्रवेश ही मिळाला.पण कसलं काय परिस्थिती आडवी आली.4 वर्षाची फी कशी भरणार आणि कोण भरणार?म्हणून मग डी. एड. चा मार्ग धरला. आणि त्यासाठी गडचिरोलीला जाऊन यावं लागलं.पण नशीबात वेगळं लिहिलं होतं.
     बाहेरुन बी.ए.ला ऍडमिशन टाकलं आणि कामाच्या शोधात मुंबई गाठली. त्या ठिकाणी मिळेल ते काम केलं. परीक्षेच्या वेळी गावी येऊन भोगेश्वराच्या मंदिरात एकाग्रतेने  अभ्यास करून पेपर द्यायचे आणि परत मुंबई गाठायची अशा रीतीनं पदवी मिळाली .आता पुढे काय? तेंव्हा मात्र कळलं की स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर मुबंई नाही तर शिक्षणाची विद्यानगरी पुणे गाठायला हवं.....मग पुण्यात राहायचं तर खायचं काय? आणि राहायचं कुठं? खर्च करणार कोण?पण या जगात देव आहे आणि तोच अँड. बी.जी.चौगले सरांच्या रूपाने भेटला. अन् आयुषाला कलाटणी मिळाली.  ते सरकारी नोटरी वकिली म्हणुन पुण्यात व्यवसाय करतात. आता ऑफिसाच्या कामात कोणा मुलाची गरज नाही असे  म्हणून  त्यांनी 4 वेळा कामावर घेण्यास नकार दिली. पण जिद्द सोडली नाही. कारण  स्वप्न पूर्ण करायचं होतं. शेवटी सरांचा नाईलाज झाला आणि त्यांनी राहायला जागा व ऑफिसमध्ये काम दिले.दिवसभर त्याच ऑफिस मध्ये काम करायचं आणि रात्री तिथंच झोपायचं असा दिनक्रम होता.पुढे विक्रीकर निरीक्षकची परीक्षा दिली. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर.सरांनी या मुलाची चमक ओळखली आणि लायब्ररी जॉईन करायला लावून काम न करता खर्चाचे पैसे द्यायचे कबूल केले व नोकरी लागल्यावर तुमचे पैसे देतो .अशी हमी देऊन जोमानं अभ्यासला सुरवात केली. सायकलवरून पुणे विद्यापीठात अभ्यासासाठी जायचं आणि मेस मध्ये जेवून सरांच्या सांगवीच्या ऑफिसात राहायचं असा दिनक्रम ठरलेला असायचा. केलेल्या  कष्टाचं आणि आई वडिलांच्या आशीर्वादाच चीज  झालं. विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली.गावातून मोठ्ठी मिरवणूक निघाली. सर्वजण गुलालात नहाले होते पण ज्याची मिरवणूक काढली त्याच्या अंगावर कपडे ही स्वतःचे नव्हते.तेव्हा सरांनी दोन जोड कपड्याचे घेऊन दिले आणि नोकरीच्या पहिल्या दिवशी त्याच दोन जोड कपड्यावर हजर झाले....

        पण त्यांना ध्येय गप्प बसू देत न्हवतं .लाल दिव्याची गाडी खुणावत होती...आय.ए.एस व्हायचं होतं यु.पी.एस.सी ची तयारी करायची होती पण  यासाठी आर्थिक पाठबळ न्हवतं. कदाचित तेव्हा मदत मिळाली असती आणि नशिबाने साथ दिली असती. कारण कष्ट करायची तयारी होती तर आता चित्र वेगळं असत. शिवाजी सुतार आणि श्रीधर पाटील यांच्यासोबत आज आय.ए.एसच्या पदावर विराजजमान असते. असो कष्ट आणि संयम या शिवाय काहीही मिळत नाही. म्हणूनच मग राज्यसेवेची तयारी सुरू केली. 5 मुलाखती झाल्या. त्यात वित्त लेखा अधिकारी वर्ग 2 आणि सप्टेंबर 2012 मध्ये नायब तहसिलदार हे पद मिळालं.

      या दरम्यान लग्न झालं त्यासाठी ही खूप 'पापड बेलने पडे'. स्वतःबरोबर बायकोलाही अभ्यासाला उद्यक्त केलं.यासाठी संसार डब्यात भरला.आणि लग्नच झालं नाही असं समजून प्रसंगी स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून तिचा अभ्यास घेतला. कारण एकच जिद्द होती तीलाही वर्ग 1 ची अधिकारी झालेलं पाहायचं होत. पण नशीब जरा आणि कुठंतरी कष्ट ही कमी पडले आणि तिलाही नायब तहसीलदार पद मिळालं..एव्हढ झालं. वाटलं सगळं सुरळीत होईल पण अजून नशिबाला परीक्षा घ्यायची होती...      दरम्यान संसार वेलीवर कळी फुलली 'तनिष्का'...5 दिवसाच्या चिमुकलीला पाळण्यात सोडून नव्या पोस्टिंगच्या ठिकाणी  800 km वर गोंदिया गाठलं...
       इथून पुढे मग तब्बल 7 वर्ष' पती पत्नी एकत्रितकरण 'या शासनाच्या गोंडस नावाखाली शासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा अनुभव आला.गोंदिया ते कोल्हापूर , कोल्हापूर ते मुंबई , मुंबई ते परत गोंदिया , कधी जामखेड ते गोंदिया असा हजारो किलोमीटरचा प्रवास 15 दिवसातून घडत होता...
       लहानग्या राधिकाचे बोबडे बोल कामाच्या ठिकाणी मन रमू देत नव्हते.तिचं पहिलं चालण्याचं दूडूदूडू पाऊलं, पहिले बोबडे बोल  ,तिचं खेळणं पहायलाच मिळालं नाही. संघर्ष काही केल्या संपत न्हवता..याच गोष्टी 'पूर्वेश'च्या बाबतीत घडू नये म्हणून दुधाची तहान ताकावर म्हणतात तसं प्रतिनियुक्तीवर 3 वर्षां पैकी 2 का होईना कुटुंबा सोबत राहता आलं..  आणि ऑर्डर आली तहसीलदार म्हणून पदोन्नतीची. अन् मागच्या सर्व आठवणी ,सर्व प्रवास, सर्व त्याग आणि संघर्ष  डोळ्यासमोर तरळून गेला...

         या सर्व त्याग ,जिद्द ,संघर्ष,संयम आणि अविरत परिश्रम याला खरंच मनापासून सलाम एवढ सगळं  आयुष्यात घडुनही कधी कोणाबद्दल वाईट विचार व कोणालाही दोष दिला नाही. आपणच कुठंतरी कमी पडलो अशीच  नेहमी भावना  राहिली...
                 शेवटी  एवढचं त्या परमेश्वराकडे मागेन ...खूप झाली परीक्षा निदान आता तरी थोडं स्थैर्य मिळू दे आणि तुझा आशीर्वाद यांच्या पाठीशी सदैव राहू दे ..यामुळं पुढची जबाबदारी पार पाडण्यासाठी बळ आणि शक्ती मिळेल...असा हा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या मुलांसाठी निश्चितच आदर्शवत असाच आहे...अजून ही खूप स्वप्न आहेत तीही पूर्ण करुन सामाजीक बांधीलकी ही जपायची आहे... यासाठी माझी साथ तुमच्या सोबत सतत राहील....
                                                   -शिल्पा निलेश पाटील
                                                            नायब तहसिलदार

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 
----------------------------------------------------------

अन् पेपर टाकणारं पोर जेव्हा तहसीलदार बनतं-----

---------------------------------------------------------------------------

समाज जागृती करणाऱ्या शॉर्ट फिल्मच्या निर्मितीची गरज-वनक्षेत्रपाल आर. एस. भगत

----------------------------------------

शिराळा येथे आख्खा मसुरसाठी प्रसिद्ध असणारा सुरेश धाबा सुरु

---------------------------------------------

कोकरूड पोलीस ठाण्याचे एकनाथ भाट व रेखा सूर्यवंशी हे एम्पलॉय ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित.

----------------------------------------------------------

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 100 खाटांचेअद्ययावत कोविड काळजी केंद्र सुरू करावे-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

--------------------------------------------------

धनगर समाजाच्या विविध मागण्या बाबत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शिराळा तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन 

------------------------------------------------

चांदोली धरणातुन विसर्ग वाढविला

----------------------------------------------------------------------

शिराळा येथील  पेपर विक्रेते राम पाटील यांचे निधन

---------------------------------------------------

शिराळा येथे बिबट्याचे दर्शन

------------------------------------------------------------

शिराळा येथील  संग्राम ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेत वीज बिल भरण्याची सोय

शिराळा  येथे संपन्न झाला रानभाज्या महोत्सव

--------------------------------------------------------------

कोरोनाची अँटीजन टेस्ट शिराळा येथे सुरू

-----------------------------------------------------------------

शिराळा तालुका युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी पौर्णिमा पवार

--------------------------------------------------

चिखली येथे सुरु झाले चाईल्ड हेल्थ पार्क

---------------------------------------------------

इनामवाडी येथील  रामचंद्र पाटील व शिराळा येथील वसंत सखाराम कोतवाल यांचे निधन

-----------------------------------------------------------

कोरोनाच्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची लूट, रोगापेक्षा इलाज भयंकर-सत्यजित देशमुख 

-----------------------------------------------------

चांदोलीत 29.52 तर कोयनेत 72.15 टी.एम.सी. पाणीसाठा


सोनवडेत शेळीवर बिबट्याचा हल्ला

---------------------------------------------------------

चांदोलीतुन 6500 क्यूसेक्सने विसर्ग सुरु


------------------------------------------------------------------

चांदोली धरणाचे दरवाजे उचलले 4400 क्युसेक्सने विसर्ग सुरू

----------------------------------------------------------

वारणाकाठी सावधानतेचा इशारा

------------------------------------------------------------------

चांदोलीत १४० मी.मी.पाऊस;  सलग दुस-या दिवशी अतिवृष्टी एक  पुल तीन बंधारे पाण्याखाली

                                    ----------------------------------------------------------------------

तहसीलदार शितलकुमार यादव यांचे निधन 

                         ------------------------------------------------------------------------------------

क्वारंटाईन असणा-या व्यक्तीने केली आत्महत्त्या 

-----------------------------------------------------------------------------------

मणदुर सरपंच यांच्या विरोधात  ग्रामपंचायत सदस्यांचा अविश्वास ठराव मंजुर

---------------------------------------------------------------------------

चांदोलीत अतिवृष्टी तर कोकरुड-रेठरे व  शिराळे खुर्द हे बंधारे पाण्याखालीचांदोलीत अतिवृष्टी तर कोकरुड-रेठरे व  शिराळे खुर्द हे बंधारे पाण्याखाली

-------------------------------------------------------------------


म्हणुन उपसरपंच यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला

------------------------------------------------------

शिराळा मध्ये 35 झाडांचे यशस्वी प्रत्यारोपण

---------------------------------------------------------

आई आणि मुलगा एकाचवेळी झाले मॅट्रीक पास

---------------------------------------------------------

तिच्या कर्तृत्वाने वारणा काठचा झेंडा नगरला फडकला अन् वारणा माईची ओटी अभिमानाने भरली



शिराळा तालुक्यात  माजी मंत्री शिवाजीराव नाईक,  सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

----------------------------------------------------------------------------------------------------

शिराळा येथे सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे दुध दरवाढीसाठी आंदोलन


कोरोनाचे रुग्ण बरे झालेल्या गावांनी काळजी घ्या पण निष्काळजीपणा नको-खासदार धैर्यशील माने


------------------------------------------------------------------------

या गावात बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त

--------------------------------------------------------------------------------

या गावातील उपसरपंचावर अविश्वास ठराव आणला असुन या बाबत 3 ऑगस्टला विशेष  ग्रामसभेत होणार निर्णय

----------------------------------------------------------------------------------------

या गावातील सरपंच यांच्या विरोधात तहसीलदार यांचेकडे अविश्वास ठराव दाखल

-------------------------------------------------------------------------------------

दहावी निकाल

------------------------------------------------------------------------------------------

बिळाथी येथील महिलेचा मृत्यूनंतर कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह

-------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------

सोनवडेत कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

--------------------------------------------------------------------------------------------

नाग पकडल्या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल

------------------------------------------------------------------------------

अशी झाली नागपंचमी: ना मिरवणुक,ना दर्शन, घरीच  केले प्रतिमा पुजन

---------------------------------------------------------------------------------

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व या पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार

----------------------------------------------------------------------

अंबामाता मंदिरात जाण्यास व  मानाची पालखी दर्शनास बंदी

---------------------------------------------------------------------

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

---------------------------------------------------------------------------------जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

---------------------------------------------------------------------------------

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

Post a Comment

0 Comments