मांगरुळ : येथील मस्के कुटुंबियांच्यावतीने उत्तरकार्य विधीप्रसंगी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचा रोप भेटीने सन्मान करण्यात आला |
शिराळा: माणसाचा जन्म आणि मृत्यु हा कोणाच्या हाती नसला करी त्याच्या येण्याच्या आणि जाण्याच्यावेळी काय करायचे हे प्रत्येकाच्या हाती असते. जन्मा नंतर बारसे धुमधडाक्यात केले जाते. मृत्यु नंतर बारावे (उत्तरकार्य) हे दु:खद घटना असली तरी चांगल्या प्रकारे केले जाते. त्या व्यक्तीची आठवण सर्वांच्या स्मरणात रहावी. त्याच्या आत्म्याली शांती मिळावी हाच त्याच्या मागील उदात्त हेतु असतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या नावाने चांगले जेवण घालुन पाहुण्यांना काही तरी आपल्या कुवती प्रमाणे भेट वस्तु दिली जाते. अशाच मांगरुळ येथील लक्ष्मण सादु मस्के यांच्या कुटुंबीयांनी अर्थिक सुबत्ता असताना ही उत्तरकार्याचा डामडौल न करता विधी साध्या पद्धतीने केला. त्यांच्या स्मरणार्थ कोरोनाच्या महामारीत माणसांच्या आरोग्यासाठी झटणा-या माणसातचं देव पाहुण त्यांच्या कार्याचा सन्मान करत गरजुंना जीवनावश्यक किट वाटप केले. अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने मस्के कुटुंबीयांनी श्रद्धांजली वाहुन समाजात वेगळा ठसा उमटवला.
मांगरुळ (ता.शिराळा ) येथे शुक्रवार (ता.१९ ) रोजी लक्ष्मण साधू मस्के (वय ६५ ) यांचे आकस्मित निधन झाले. निधनानंतरही गर्दी न करता शारीरिक अंतराने सर्व विधी आटोपले. मात्र सांत्वन करण्यासाठी येणारे पै-पाहुणे, मित्रमंडळी, नातलग, आप्तस्वकीय यांनी भेटण्यास येऊ नका घरातच थांबा...असा संदेश सोशल मिडीयावर देऊन सामाजिक भान जोपासण्याचे काम शिराळा सज्यात तलाठी म्हणून कार्यरत असणारे अभिजीत मस्के, उपसरपंच सुनंदाताई मस्के, मुलगा अमोल मस्के, मुलगी सीमा, ग्रामसेविका मुलगी शुभांगी सुर्यवंशी यांनी केले होते.
मंगळवार (ता.३० ) रोजी त्यांच्या वडीलांचा उत्तरकार्य विधी होता. घरगुती पद्धतीने विधी झाला. उत्तरकार्य विधीस येणाऱ्या अनाठायी खर्चास फाटा देत 'कोरोना' विषाणूला थोपविण्यासाठी कशोसीने प्रयत्न करणाऱ्या मांगरुळसह शिंदेवाडी, बेलेवाडी गावातील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंमसेविका,स्थानिक 'कोरोना' जनजागृती पदाधिकारी यांना तहसिलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत किटचे वाटप करुन त्यांच्या सेवेप्रतीचा सन्मान 'रोप भेटिने' करण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 'दहा हजार' रुपयांचा धनादेश तहसिलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांचेकडे सुफुर्द करण्यात आला.
शिराळा पश्चिम-उत्तर भागात 'कोरोना' विषाणूची वाढत जाणारी व्याती, होणारा संसर्ग याचा विचार करता विषाणूचे महाभयानक संकट दारात उभा असताना सर्वांची संसर्ग थांबविण्याची एक सामाजिक बांधीलकी म्हणून आपण सर्वांनी 'कोरोना' विषाणूला गांभीर्याने घेण्यासह सर्वांनी सामाजिक अंतर राखणे काळाची गरज असल्याने 'सांत्वनासाठी आमच्या घरी' येणे टाळावे, घरातच थांबावे व आमच्या दु:खात सहभागी व्हावे असा सल्ला मस्के कुटुंबियांनी नातलग, मित्रपरिवार, आप्तस्वकीय यांना सोशल मिडीयावरवरून देत त्याचे अनुकरण करत सामाजिक भान जोपासले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================
खालील हेडींगवर क्लिक करुन वाचा या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या
================================================================
गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...
====================================================================
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
=====================================================================
=====================================================================
प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर
----------------------------------------------------------------------------------------------------------------------कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ
=======================================================================
भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-
---------------------------------------------------------------------------------------------------------------------चिखली येथे २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान
=====================================================================
ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा
---------------------------------------------------------------------------------------
विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष
इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
मतदार संघाला कुटुंब मानुन सुख दु:खात सदैव पाठीशी खंबीर असणारे नेतृत्व- आमदार मानसिंगराव नाईक=सदाजी पाटील (उपसरपंच आरळा)
=====================================================================
कार्यकर्त्यांची कदर असणारे नेतृत्व - आमदार मानसिंगराव नाईक =सुनिता निकम बांधकाम सभापती शिराळा नगरपंचायत
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------

0 Comments