BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अशी झाली नागपंचमी: ना मिरवणुक,ना दर्शन, घरीच केले प्रतिमा पुजन

ब्रेकिंग न्युज

सांगली जिल्ह्यात आज 95 रुग्ण सापडले आहेत. तालुका निहाय रुग्ण असे. आटपाडी 18, जत 1, कवठेमहंकाळ, पलुस, शिराळा प्रत्येकी 2,  मिरज 6,तासगाव 4, वाळवा 3, महानगरपालिका 57 असे एकुण 95 रूग्ण आहेत.


शिराळा तालुक्यातील  वाकुर्डे बुद्रुक  3,घागरेवाडी, टाकवे,करुंगली प्रत्येकी 1,आंबेवाडी 2,गवळेवाडी  6.  शुक्रवारी रात्री उशीरा  12 व आज 2 असे एकुण 14 रुग्ण पॉझिटीव्ह  आले आहेत. गवळेवाडी येथील रुग्ण कोरोना बाधितांच्या संपर्कातील असुन उर्वरीत सर्व मुंबईहुन आले आहेत.


गवळेवाडीच्या 15 पैकी सध्या उपचार घेणा-या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  14 झाली आहे. एक मयत आहे. त्यामुळे  तालुक्यात उपचार घेणा-या रुग्णात गवळेवा़डी नंबर वन आहे. 



शिराळा, ता.२५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिराळकराना प्रतिकात्मक नागाची मिरवणूक नाही,ना अंबामाता दर्शन ,ना पालखी दर्शन ,फक्त घरोघरी महिलांनी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी  साजरी केली. शिराळा नागपंचमीच्या इतिहासात हजारो भक्ताविना नागपंचमी घरगुती पद्धतीने साजरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या बातमीचा व्हिडिओ पहा



 शिराळाकर प्रथम अंबामाता मंदिरात नाग प्रतिमेची पूजा करून नंतर घरी पूजा करतात. परंतु या वर्षी मंदिरात जाण्यासाठी व मानाच्या पालखीच्या दर्शनाला बंदी आहे. त्यामुळे महिलांनी घरीच नाग प्रतिमेची पूजा करून घरातूनच अंबामतेचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवला. सकाळी अंबामाता मंदिरात पुजारी यांनी विधीवत पूजा व आरती केली. दुपारी १वाजता महाजन यांच्या  घरी नागाची विधीवत पूजा करून घरातून मानाची पालखी अंबामाता मंदिरात नेण्यात आली. पालखी सोबत पांडुरंग महाजन, प्रणव महाजन, अनिरुद्ध महाजन, श्रेयश महाजन,सागर कोतवाल,काशीनाथ नलवडे, अक्षय नलवडे,कृष्णात डवरी उपस्थित होते. मंदिरात दर्शन घेऊन पालखी परत नेण्यात आली. सकाळ पासून मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौका चौकात बंदोबस्त होता. यासाठी वन विभाग व पोलीस यंत्रणा असे एकूण २७४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सर्वांच्यावर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली होती.
ही खबरदरी म्हणून वनविभागाचे १६४ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते यात उपवनसंरक्षक १, विभागीय वनसंरक्षक १, सहायक वनसंरक्षक ४, वनक्षेत्रपाल १०, वनपाल २३, वनरक्षक ४५, वनमजुर ८० असे एकूण १६४ कर्मचारी होते. १० गस्ती पथक होती. वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ होती .शिराळा शहरा बरोबर ग्रामीण भागातील तडवळे, उपवळे, ओझर्डे, सुरुल, कुरळप या गावावर ड्रोनची नजर होती.
मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता. १ पोलिस उपअधीक्षक, ७ पोलिस अधिकारी,  ६० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड, १ दंगल नियंत्रण पथक, २ फिरते पथक असा एकूण ११० लोकांचा बंदोबस्त होता.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, उपवनसंरक्षक पी.बी.धानके,विभागीय वनसंरक्षक सागर गवते यांनी भेट दिली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, डी.बी.कदम,  पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, सहायक वनसंरक्षक जी.आर.चव्हाण, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, मनोजकुमार कोळी, युवराज पाटील, अरविद कांबळे, एस.एल.डोंबळे, आर.एस.कांबळे, डी.ज.सोनवणे, आर.एस.भगत, स्नेहल भगत, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक सचिन पाटील, देवकी ताशीलदार, संपत देसाई,बाबा गायकवाड पोलीस व वनविभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. नगरपंचायतचे मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. बंदोबस्तासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिराळा तालुका कामगार परिषद व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्यावतीने चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले. बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे.डी.राजमाने व त्यांचे पथकाने आरोग्य तपासणी केली.

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

अशी झाली नागपंचमी: ना मिरवणुक,ना दर्शन, घरीच  केले प्रतिमा पुजन


नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व या पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार


अंबामाता मंदिरात जाण्यास व  मानाची पालखी दर्शनास बंदी


कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

--------------------------------------------------------------------------------------------------------------

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त


Post a Comment

0 Comments