BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खपत नसलेली खते लिंक करुन शेतक-यांच्या माथी मारणा-यावर कडक कारवाई करा- आमदार मानसिंगराव नाईक

ब्रेकिंग न्युज

शिराळा तालुक्यातील येळापुर येथील  38 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर मिरज येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.  त्यांच्या संपर्कातील 17 लोकांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. येळापुर येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज अखेर तालुक्यातील २८ गावे कोरोना बाधित झाली आहेत .तालुक्यात एकूण १४०रुग्ण झाले आहेत.तालुक्यातील रुग्ण संख्या अशी:मणदूर  ६३, रिळे  ६ , निगडी ८, किनरेवाडी,कोकरूड ४, मांगले, रेड,शिराळा प्रत्येकी ३, मोहरे , खेड , खिरवडे , सोनवडे - ( काळोखेवाडी ) , माळेवाडी, बिळाशी येथे प्रत्येकी २ , अंत्री खुर्द , करुंगली , चिंचोली , पणुंब्रे तर्फ शिराळा , लादेवाडी , पुनवत , कोकणेवाडी ,ढाणकेवाडी, उपवळे, चरण, मोरेवाडी,येळापूर प्रत्येकी एक, शिराळे खुर्द  २० असे १४० रुग्ण झाले आहेत.


शिराळा : जी खते खपत नाहीत ती खते लिंकिग करून शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. जो कोणी खत विक्रेता असे उद्योग करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी कडक शब्दात सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिल्या.


आज त्यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तालुका आढावा बैठक झाली. त्यावेळी कृषि विभागावरील चर्चेच्या वेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, चालू वर्षी शिराळा तालुक्यात ऊस क्षैत्रात जवळपास तीस टक्के वाढ झाली आहे. तर जवळपास पंचेचाळीस हजार हेक्टरमध्ये खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. सध्या शेतीसाठी रासायनिक खताची अंत्यत गरज आहे. मात्र जी खते खपत नाहीत, ती खते लिंकीगच्या नावाखाली शेतक-यांच्या गळ्यात घालण्याचा उद्योग सूरू आहे. तो तातडीने बंद करा. कृषी विभागाने धडक कार्यवाही करावी. शेतक-यांना वेठीस धरणारांची गय केली जाणार नाही. ज्या दुकानदारांनी हा उद्योग केला आहे, त्यांची तपासनी करून तातडीने कारवाई करावी, अशा सुचना कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारीऱ्यांना दिल्या.या वेळी शासनाच्या विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा आमदार नाईक यांनी घेतला.
आमदार नाईक म्हणाले, तालुक्यात कोरोनाची परिस्थिती नियत्रनाबाहेर चालली होती मात्र आरोग्य विभागाच्या, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ती नियंत्रनाखाली आली आहे. ही बाब आदर्शवत असली तरीही अजूनही आरोग्य विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. तालुक्यात अजूनही काही लोक मुंबई-पुणे त्याचबरोबर बाहेर गावावरून येत आहेत. त्यांची कसून चौकशी करावी. त्या आवश्यकतेनुसार त्यांना काँरोन्टाईन करावे. त्याच्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजा घ्यावी.
गुढे-पाचगणी उप केद्राचे काम तातडीने पुर्ण करावे. त्याचबरोबर तडवळे येथील जुनी प्राथमीक आरोग्य केद्राची इमारत पुर्ण खराब झाली असून त्याचे निर्लेखनाचा प्रस्ताव दिला आहे. त्याचे कामही लवकरच पुर्ण होईल. मात्र तोपर्यंत आरोग्य विभागाची गैरसोय होवू देवू नका तातडीने पशुवैध्यकीय दवाखान्यात जागा उपलब्ध करून द्यावी.
तालुक्यात गेल्यावर्षी पुर परिस्थितीचा चांगलाच फटका वारणा काठच्या गावांना बसला होता. चालू वर्षी ती वेळ लोकांच्यावर येवू देवू नका. त्यासाठी प्रशासनाने सतर्क रहावे उपलब्ध असणा-या एका बोटीवर अवलंबून न रहाता अजूनही बोटी उपलब्ध कराव्यात. पशुवैध्यकीय विभागाने घटसर्फ व फ-या रोगांचे लसीकरन वाडी वस्तीसह सर्वच ठिकाणी आठवड्याभरात पुर्ण करावे . शिक्षण विभागाने मुलांना 100 टक्के पाठ्यापुस्तके पुरवावीत. ज्या ठिकाणी याअद्याप दिलेली नाहीत त्या ठिकाणी तातडीने देण्यात यावीत.
आमदार नाईक म्हणाले, विज वितरन कंपनीने अध्यापही काही ठिकाणी विज कनेक्शन दिलेली नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा व ती तातडीने देण्यात यावीत त्याचबरोबर पावसाळ्यात सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा बंद करावा. ज्या ठिकाणी तारा तुटलेत त्या तातडीने जोडण्यात याव्यात. त्याचबरोबर डांब कमकुवत झालेत तेही बदलण्यात यावेत. गिरजवडे येथील एम.आय.टँक मध्ये ज्या शेतक-यांच्या विहरी गेल्या आहेत. त्यांनी पर्यायी ठिकाणी विहरी काढल्या आहेत. त्यांना तातडीने विज कनेक्शन द्यावीत. त्याचे नुकसान होवू देवू नका, अशा सुचना त्यांनी विज वितरणच्या अधिका-यांना दिल्या.
तालुक्यात चालू वर्षी तीस टक्के ऊसाच्या क्षैत्रात वाढ झाली आहे. ज्या पटीत क्षैत्र वाढले आहे, त्या तुलनेत अजूनही कर्ज वाटप झालेले नाही. बहुतांशी शेतक-यांना सातबारा काढण्यासाठी अडचणी येत आहेत. त्या महसूल विभागाने सोडवाव्यात. तालुक्यात आधार कार्ड नसलेल्या 11 शेतक-यांना असूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यावरती पर्याय काढून त्यांना तातडीने लाभ देणेत यावा.


तहसिलदार गणेश शिंदे म्हणाले,शेतक-यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी जर सातबा-याची अडचन येत असेल तर अशा लोंकाची यादी तयार करून द्यावी. त्यांना सातबारा देण्याची सोय केली जाईल. त्याचबरोबर ज्या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, त्यांची यादी द्यावी. त्यांनाही लवकरच लाभ मिळवणेसाठी प्रयत्न केले जातील.या आठावा बैठकीस गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, माजी सभापती, प. स. सदस्य सम्राटसिंग नाईक, युवा नेते विराज नाईक, संचालक शिवाजी पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी अरविंद माने, शिराळा नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, वैद्यकीय अधिक्षक विलास रावळ, सहायक पोलीस निरीक्षक डी. बी. कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उप अभियंता प्रल्हाद बुचडे, पशुवैद्यकीय अधिकारी के. जी. माळी, वन परिक्षेत्र अधिकारी सुशांत काळे, गट शिक्षण अधिकारी टी. एस. कुडाळकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डी. एस. खताळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तालुका निरीक्षक ए. डी. देसाई आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------

वाढदिवसाचा  खर्च टाळून‌ मल्लविद्या कुस्ती केंद्रातील मल्लांना  वाटले तूप 

---------------------------------------------------------------------

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण






===========================================================

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

-----------------------------------------------------------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

--------------------------------------------------------------------------------------------------------------
============================================प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु- 
=====================================================

चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद

======================================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

========================================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==========================================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

=============================================================

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

============================================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

=============================================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

=============================================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

===============================================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

================================================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...====================================================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

=====================================================================

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments