BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

ब्रेकिंग न्युज


शिराळा,ता.१२:येथील पाडळी नाका येथील मुंबई येथे कार्यरत असणारे वाहतूक विभागाचे हवलदार सुरेश ईश्वरा जाधव (वय ५५) यांचा  कोरोनाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.मुंबईस्थित  तालुक्यातील पोलीस दलातील कोरोनाचा तिसरा बळी  आहे.

 जाधव मुंबई येथील येथील वाहतूक विभागात हवालदार म्हणून कार्यरत होते. तीस वर्षे त्यांची पोलीस विभागात सेवा झाली आहे .त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेले २५ दिवस उपचार सुरू होते. मात्र गेले २५ दिवस कोरोनाशी  असलेला लढा रविवारी सकाळी ९ वाजता अयशस्वी झाला. मुंबईत त्यांच्या सोबत पत्नी , दोन मुले , एक  पोलीसमधून सेवानिवृत्त झालेला भाऊ तर शिराळा येथे भावजय , पुतण्या, सून असा परिवार आहे.                                                    तालुक्यातील ही तिसरी घटना

१६ मे रोजी शाहूनगर(मुंबई) येथे सहायक पोलिस निरीक्षक असणारे शिराळचे सुपुत्र अमोल कुलकर्णी  व १८ मे रोजी  मुंबईत नागपाडा येथे दहशदवाद विरोधी पथकात पोलीस हवलदार असणाऱ्या पाडळीच्या  दिलीप पाटील यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. आज सुरेश जाधव यांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील व पोलीस दलातील तिसरी घटना आहे.



शिराळा तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू झाल्याने भांगलन,कोळपण, रोप लावणीच्या कामांना गती आली असून शिवार माणसांनी फुलून गेला आहे. या बातमीचा व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा


शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. सध्या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  पावसाची संततधार कायम असली तरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे सोनवडे, येसलेवाडी, भाडूगळेवाडी, भाष्टेवाडी, मिरुखेवाडी, खोतवाडी ,बेरडेवाडी, गुढे,पाचगणी,मानेवाडी या परिसरात रोप लावणीच्या कामांना गती आली आहे. रोप लावणीसाठी तरु उपटने, शेतात चिखल करणे, रोप लावणे या कामांसाठी लोकांची शिवारात गर्दी दिसत आहे. लॉक डाऊन मुळे शाळांना सुट्टी असल्याने लहान मुले ही या रोप लावणीच्या कामात आई बाबांना मदत करत आहेत. माळरानावर भुईमूग भात कोळपणीसाठी अनेक ठिकाणी माणसांची कमतरता भासत असल्याने बैल कोळपणीवर भर दिला जात आहे. कोरोनामुळे एका गावातील मजूर दुसऱ्या गावात जात नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी मजूर कमतरता भासत आहे. त्यामुळे गावातील लोकांनी पैरा पद्धतीवर जास्त भर दिला आहे. घरातील जास्ती जास्त लोकांचा वापर करून ही शेती मशागतीची कामे पूर्ण करण्यावर सर्वांनी भर दिला आहे.सध्या ट्रॅक्टरच्या जमान्यात बैलांची संख्या कमी झाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीसाठी जास्त मागणी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यातील बळीराजा आपल्या कुटुंबासह आपापल्या शेतात क्वारंटाईन झालेला दिसून येत आहे.

इतर बातम्या

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण






===========================================================

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

-----------------------------------------------------------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

--------------------------------------------------------------------------------------------------------------

9 जुलैपासुन मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू रहाणार

============================================प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु- 
=====================================================

चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद

======================================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

========================================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==========================================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

=============================================================

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

============================================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

=============================================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

=============================================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

===============================================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

================================================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...====================================================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक 

=====================================================================

प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर 

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments