BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन

कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील लढाई जिंकण्यासाठी आरोग्य विभाग आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत.त्यांच्या सोबत पोलीस यंत्रणा सफाई कामगार, होमगार्ड, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,व इतर अनेक विभागातील कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. यामध्ये महत्वाचा वाट आहे तो म्हणजे  कोरोना बाधित व संशयित रूग्णांना रुग्णालयात व  घरी पोहच करणाऱ्या १०८ व इतर रुग्णवाहिका चालकांचे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या वैद्यकिय अधिकारी यांचा आहे. या कोरोनाच्या कुरुक्षेत्रावर रुग्णवाहिकेचा रथ हकणारी डॉक्टर आणि चालक या  आधुनिक कृष्ण -अर्जुनाची जोडी रुग्णांच्यासाठी देवदूत बनली आहे.

     शिराळा सारख्या डोंगरी विभागाला या सेवेचा मोठा लाभ मिळत असून यामुळे लोकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळण्यास मदत होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत व भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून  संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 जानेवारी २०१४ पासून ९३७ रुग्णवाहिका   कार्यरत आहेत.  यापैकी २४ रुग्णवाहिका सांगली  जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत सध्या कोरोनाच्या परीस्थितीमध्ये महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. २४ मार्च पासून आजपर्यंत ६३२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे यापैकी ३०५ रुग्ण बरे झाले आहेत तर उर्वरित ३१० कोरोना रुग्णावरती उपचार चालू आहेत.                                                               

           आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांच्याबरोबरच  रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टरसुद्धा कोरोना वारीयर्स म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.कोरोना रुग्णांना ने-आण करण्याची महत्वाची जबाबदारी १०८ रुग्णवाहिकावर देण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांना संस्थात्मक कॉरंटाईन करणे ,जिल्हा रुग्णालयात आणणे,ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडणे हि जबाबदारी १०८ रुग्णवाहिकावर देण्यात आली आहे.२४ रुग्णवाहिका कोरोना रुग्णासाठी  काम करत आहेत.आजपर्यंत कोरोना संशयीत  व कोरोना बाधित असे एकूण चार हजार पेक्षा जास्त रुग्णांनी १०८ सेवेचा लाभ घेतला आहे. याबरोबरच सर्पदंश ,हृदयविकार ,गरोदर माता ,अपघात यासारख्या  रुग्णांनाही  सेवा देणे अविरतपणे चालू आहे.          हि सेवा देणाऱ्या सर्व चालकांना व डॉक्टरना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे चालक व डॉक्टर याच्या सुरक्षिततेसाठी पी.पी.ई, कीट ,सॅनिटाइझर, हातमोजे ,रुग्णवाहिका निर्जंतुक करण्यासाठी सोडीयम हायपो क्लोराईड कंपनी कडून पुरविण्यात आले आहे. अशा या कोरोना महामारीच्या कुरुक्षेत्रावरी या आधुनिक श्रीकृष्ण अर्जुनाच्या जोडीचे सर्वत्र कौतुक होत असून ते या रुग्णांसाठी देवदूतच बनले आहेत.

इतर बातम्या

--------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.

---------------------------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन

-------------------------------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

---------------------------------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

---------------------------------------------------------------------------------

9 जुलैपासुन मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू रहाणार

============================================प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु- 
==============================================

चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद

==============================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

==============================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==============================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

==============================================

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

==============================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

==============================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

==============================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

==============================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

==============================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

---------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...=============================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

==============================================

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक 

==============================================

प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर 

---------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=============================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments