BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील कृषी दुकाने १० ते १२ जुलै पर्यंत तीन दिवस बंद


शिराळा, ता. ९:महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाईड सिड्स डीलर्स असोसिएशनच्या  विविध मागण्याबाबत कार्यवाही होत नसल्याने राज्यातील कृषी विक्रेत्यांचा उद्या १० जुलै पासून १२ जुलै पर्यंत असणाऱ्या राज्यव्यापी  तीन दिवसाच्या बंद  मध्ये  शिराळा तालुक्यातील कृषी दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती शिराळा कृषी निविष्ठा असोसिएशन शिराळचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी दिली.



यावेळी ते म्हणाले,सोयाबीन बियाणे उगवले नसल्या प्रकरणी विक्रेत्यावर गुन्हे दाखल करणे, विक्रेत्याकडून तपासणीसाठी बियाणे नमुन्यांची पंधरा वर्षाची सुमारे पंधरा कोटीपेक्षा शासनाकडून ज्यादा येणे असलेली रक्कम परत मिळणे,  वापराची मुदत संपलेली कीटकनाशके उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्याकडून परत जमा करून घेणे, परवाना नूतनीकरणाची रक्कम राज्यांमध्ये एकाच दराने आकारणी करणे,  दुकानातील साठा रजिस्टर संगणकीय पद्धतीने ठेवण्यास मान्यता देणे या मागण्या कृषी विभागाकडे गेल्या अनेक वर्षापासून केले आहे. त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. सोयाबीन किंवा इतर कोणतेही बियाणे उगवले नसल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीला अनुसरून विक्रेत्याला जबाबदार धरून त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात येऊ नयेत,अशी मागणी राज्याचे कृषी आयुक्त  सुहास दिवसे यांना संघटनेकडून करण्यात आली आहे .राज्याचे कृषिमंत्री यांची संघटनेच्यापदाधिकऱ्यांनी समक्ष भेट घेतली. परंतु शासनस्तरावरून विक्रेत्या वरील अन्यायकारक कारवाई थांबवण्यात आली नाही किंवा रद्द झाली नाही . त्यामुळे विक्रेत्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. खालील  हेडींगवर क्लिक करुन वाचा  या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या 

---------------------------------------------------------------------

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

===========================================================

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

-----------------------------------------------------------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

--------------------------------------------------------------------------------------------------------------
=======================================================

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु- 

=====================================================

चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद

======================================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

========================================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==========================================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

============================================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

=============================================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

=============================================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

===============================================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

================================================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...

====================================================================


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

=====================================================================

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments