BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सर्जेरावदादा नाईक बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणी तक्रारी बँक प्रशासनाकडे द्याव्यात: रीतसर पोलिसात गुन्हे दाखल करू :प्रशासक आदिनाथ दगडे यांचे आवाहन

या बातमीचा व्हिडीओ पहा



शिराळा ,ता.२१:येथील सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेच्या कर्जाच्या नोटिसा ज्या लोकांना मिळाल्यात पण प्रत्यक्षात त्यांनी कर्ज घेतले नाही  अशा लोकांनी बँक प्रशासकाकडे तक्रारी नोंदवाव्यात. या फसवणूक प्रकरणी संबंधितांवर रितसर शिराळा पोलिसात गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती बँकेचे प्रशासक आदिनाथ दगडे यांनी दिली.        येथील सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर दिलीप पाटील,अकाउंटंट पांडुरंग कुंभार उपस्थित होते.

     यावेळी दगडे म्हणाले,  बँक प्रशासकाकडून या १७६१ कर्जदारांना नोटिसा पाठविल्यानंतर अनेक बोगस कर्जदार असल्याचे आढळून आले आहेत. नोटिसा मिळाल्यानंतर आम्ही कर्ज काढलेले नाही तर आम्हाला नोटीस कशी अशी विचारणा अनेकांच्या कडून होऊ लागली आहे. कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातूनही या तक्रारींचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. बोगस कर्जांच्या संदर्भात प्रशासकाकडे आलेल्या तक्रारीवरून या बँकेत बोगस कर्जांचे वाटप यापूर्वीच्या कालावधीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

        सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांच्या संदर्भात असे प्रकार घडले आहेत. ते नागरिक त्यांच्या जवळ असणाऱ्या पोलीस ठाणे मध्ये तक्रारी नोंदवित आहेत. सगळीकडून या तक्रारी नोंदवल्या जात असल्याने यामध्ये फारच मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. ज्यांच्या संदर्भात अशा घटना घडलेल्या आहेत त्या तक्रारदारानी बँक प्रशासकाकडे तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून सर्वांच्या तक्रारी एकत्रित  करून  त्यांची शासकीय लेखापरीक्षक यांच्या मार्फत शहानिशा करून  विभागीय सह निबंधक कोल्हापूर  यांच्या आदेशानुसार या सर्व तक्रारी एकाच ठिकाणी शिराळा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात येतील. सर्वांच्या तक्रारी एकाच पोलीस स्टेशनला दाखल झाल्यामुळे आगामी काळातील कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास सुलभता निर्माण होणार आहे.  बँकेत असणाऱ्या ठेवींचे विमे असल्याने कोणी ही घाबरण्याची गरज नाही.  वसुली प्रक्रिया सुरू असून सर्वांच्या ठेवी टप्या टप्याने दिल्या जातील.


इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त



-------------------------------------

Post a Comment

0 Comments