BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलनाचे तहसीलदार यांना निवेदन

ब्रेकिंग न्यूज

सांगली जिल्ह्यात आज १०६ कोरोना रुग्ण सापडले असून  महानगरपालिका कार्यक्षेत्र सर्वाधिक ७९ रुग्ण सापडले आहेत.

तालुका निहाय संख्या अशी,आटपाडी ३,जत ५, कडेगाव,शिराळा,तासगाव प्रत्येकी १,खानापूर ६, मिरज ७,वाळवा ३, असे एकूण १०६ रुग्ण सापडले आहेत.

शिराळा:दूध उत्पादक व  शेतकऱ्यांच्या हितासाठी गायीच्या दुधाला व दूध पावडरला अनुदान मिळावे यासह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी भाजपा व महायुतीच्या वतीने १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आशयाचे निवेदन शिराळा विधानसभा मतदारसंघाचे वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांचेकडे पाठविण्याकरिता तहसीलदार यांना दिले असल्याची माहिती माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.          शिवाजीराव नाईक म्हणाले, आम्ही तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी व दूध उत्पादक यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. शेतकऱ्यांना न्याय द्यायला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या सरकारने गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रुपये अनुदान व दूध पावडरसाठी प्रती किलो ५० रुपये अनुदान द्यावे. यासह शेतकरी बांधवांना सध्या अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. त्यांना बँकांकडून कर्ज पुरवठा नाकारला जातो आहे. नकली बियाणे विक्री केली जात असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. खतांचा तुटवडा निर्माण केला जात आहे. अनेक ठिकाणी खतांच्या बाबतीत लिंकिंग होत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील शेतकरी वादळामुळे कोलमडून पडला आहे. या सगळ्यात शेतकरी व यावर अवलंबून असणाऱ्या दूध उत्पादक नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दयनीय अवस्था झालेल्या या शेतकऱ्यांना शासन कोणताही दिलासा देत नाही. 


          महाराष्ट्रात १ कोटी ४० लाख लिटर गाईचे दूध उत्पादित होते त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून दूध खरेदी केली जाते. ९० लाख लिटर दूध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल्स व थेट ग्राहकांना पुरवतो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केली जाते. कोरोना लॉक डाऊनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यवसाय बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून १५ ते १६ रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रति लिटर या दराने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान दूध भुकटी म्हणजेच पावडर करता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान आणि त्याचबरोबर शासनाकडून ३० रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी व्हावी या न्याय्य मागणी करता आम्ही सर्व दूध उत्पादक व इतर शेतकरी बांधव १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध एल्गार आंदोलन करणार आहोत.        शिराळा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने नायब तहसीलदार विजय कोकाटे यांना भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, आनंदराव पाटील, उत्तम पाटील, संजय पाटील, नगरसेवक बंडा डांगे, सचिन यादव, अशोक काळे, सरपंच विजय महाडिक, मोहन पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.




इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

-------------------------------------


Post a Comment

0 Comments