ब्रेकिंग न्यूज
शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथे कोरोना बधिताच्या संपर्कातील दोन युवक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
शिराळा, ता.२०: शिराळा तालुका भाजपच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सम्राट महाडीक यांच्यावतीने तहसीलदार यांना देऊन १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे, महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेदिवस भर पडत आहे. बँकेकडून कर्ज पुरवठा न होणे, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्याकाळात दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर दुध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकीय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते.
या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रु. दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रु. प्रती लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केले जात आहे. मंत्र्याचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटर १० रु. अनुदान, दुध भुकटी करिता प्रती किलो ५० रु अनुदान, शासनाकडून ३० रु. प्रती लिटरने दुधाची खरेदी या न्याय्य मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करीत आहोत.याचा गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
यावेळी सुमंत महाजन,जयसिंगराव शिंदे,प्रतापराव पाटील,नगरसेवक केदार नलावडे,रामचंद्र जाधव,मंदार उबाळे उपस्थिती होते.
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------
भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
----------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
----------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
====================================
==============================================
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments