ब्रेकिंग न्यूज
शिराळा, ता.१९: शिराळा तालुक्यातील येळापूर पैकी कुंभवडेवाडी येथील ५५ व ५० वर्षीय पती पत्नी तर शिराळा येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील २३ वर्षाचा युवक असे तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.गवळेवाडी येथील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील कोरोनाचा हा चौथा बळीआहे.
येळापूर परिसरात सलग दोन दिवस कोरोनाने दोन बळी गेल्याने परिसर हदरला आहे. यापूर्वी मोहरे व मणदूर येथे कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. कुंभवडेवाडी येथे पतिपत्नी १४जुलैला मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन झाले होते. ५० वर्षावरील लोकांचे स्वँब घेतले जात आहेत.त्या प्रमाणे घेतले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिराळा येथील कोरोना बधिताच्या संपर्कातील २३ वर्षाचा युवक पॉझिटिव्ह आला आहे.
शिराळा,ता.१७: महाराष्ट्र सरकारने दिल्लीच्या पाऊलावर पाऊल ठेवणे बंद करन २५ जुलै पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उर्जा मंत्र्यांनी कोरोना काळात दिलेली वीज बिले परत घ्यावीत अन्यथा मी लाईटबिल भरणार नाही हे जनआंदोलन राज्यभरात करु असा इशारा कॉ. धनाजी गुरव यांनी दिला. यावेळी शिराळा तहसील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून मी वीज बिल करणार नाही या जनआंदोलनाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी शिराळा तालुका कामगार परिषदेच्या वतीने नायब तहसीलदार ए.डी. कोकाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी विजयकुमार जोखे, कॉ. दिपक कोठावळे.प्रा. मिलींद साळवे, शिराळा तालुका कामगार परिषदचे अध्यक्ष मारूती रोकडे, अहमद मुंडे, शिराळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अँड. रवी पाटील, अमोल साठे,स्वाती भस्मे,सचिन गायकवाड,गजानन पवार, सचिन अवघडे, अनिल माने, राजेंद्र माने,सुभाष कदम उपस्थित होते. -----------
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
----------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
----------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments