BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

....तर कडवा संघर्ष करू

शिराळा:शेती पंपाची व घरगुती वीज ग्राहकांची  वीजबिले सरसकट माफ करावी लॉक डाऊन  काळामध्ये जनता पुरती  हैराण झाले आहे. जीवन जगणं कठीण बनला असताना प्रचंड रकमेची विज बिले देऊन जनतेला मोठा शॉक दिला आहे. सरकारने त्वरित सरसकट वीज बिले माफ करावीत. अन्यथा रस्त्यावर उतरून कडवा संघर्ष करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, भाजप नेते सत्यजित देशमुख यांनी दिला.

       

  कोरोनाच्या संक्रमणामुळे लॉकडाऊन काळात सर्वसामांन्य माणसाला जगणे मुश्कील होऊन बसले आहे.  लोकांना कामधंदा नाही, अनेक लोक नोकऱ्या सोडून घरात बसले आहेत,  पैसा नाही, उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे बंद झाले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने व वीज वितरण कंपनीने ग्राहकांना घरगुती वीज बीले वाढवून देऊन एक प्रकारचा शॉक दिला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात घरगुती वीज बिले ग्राहकांना आले आहेत. ही विज बिले सामान्य ग्राहक भरू शकत नाही. विज वितरण कंपनी ने या विज बिलामध्ये वीज दर कर,  इंधन कर ,अधिभार अशी वेगवेगळी शुल्क आकारणी केली आहे. ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचाचे काम केले आहे.यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. 

           एका बाजूला सरकार सांगते  कोरोनाच्याच्या काळामध्ये 100 युनिट च्या आतील सर्व वीज बिले माफ करणार परंतु माफी बाजूलाच राहिली असून सरासरी बिलांच्या किती तरी पट्टीमध्ये बिले ग्राहकांना देण्यात  आहेत. सरकार व वीज वितरण कंपनीने संयुक्तरित्या पुढाकार घेऊन वाढीव वीज दर मागे द्यावी, सामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा. जी वीज बिले ग्राहकांना देण्यात आली आहेत त्याला स्थगिती द्यावी. अशी मागणी सरकारकडे करत आहोत.

शिराळा विधानसभा मतदारसंघातील जनता उपजिविकेसाठी पुणे मुंबई इतरत्र लोक आहेत मात्र कोरोनाच्या संकट काळामध्ये जनता कामे धंदे,  नोकऱ्या,  छोटे-मोठे व्यवसाय सोडून घरी आहेत. या विभागातील जनता अल्पभूधारक असून डोंगर दऱ्यांनी बऱ्याच जागा व्यापले आहेत. त्यामुळे इतरत्र जाऊन लोकांना उपजीविका केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र आर्थिक उत्पन्नाचे साधन सद्यस्थितीमध्ये अगदीच तुटपुंजी आहे. तर सामान्य वर्ग कसा बसा जीवन जगत आहे, जीवन जगने  कठीण झाले आहे. अंऩ्न,वस्त्र, निवारा, वीज, पाणी इतर सुविधा स्वतःसाठी पुरवणे मध्ये हे यांची दैना उडाली आहे. या सर्व परिस्थितीचा सरकारने गांभीर्याने खोलवर विचार करणे गरजेचे आहे. आणि सरसकट शेतीपंपाचे व घरगुती ग्राहकांचे वीज बिले माफ केली तरच  इथली जनता जगेल अन्यथा कोरोना तून  वाचलो आणि वीज बिलातून मारलो अशी अवस्था  येणाऱ्या काळामध्ये पहायला मिळेल. सरकारने राजकारण न आणता संवेदनशील परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर असा निर्वाणीचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

======================================================================

खालील  हेडींगवर क्लिक करुन वाचा  या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या 

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

============================================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

=============================================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

=============================================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

===============================================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

================================================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...

====================================================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

=====================================================================

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------





Post a Comment

0 Comments