शिराळा, ता.२३: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व इतर पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार असून वन विभागा मार्फत प्रथमच ड्रोनचा वापर करता येत आहे. याची चाचणी आज घेण्यात आली. जगप्रसिद्ध असणारी शिराळची नागपंचमी २५ जुलैला आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने अंबामता मंदिरात लोकांना दर्शनासाठी जाण्यास बंदी आहे. प्रतिकात्मक नाग प्रतिमेची मिरवणूक ही निघणार नाही. फक्त मोजक्या लोकांच्या समवेत मानाची पालखी निघणार आहे. तरी ही न्यायालयाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे. कोणी ही जिवंत नाग पकडू नये, मिरवणूक काढू नये अशा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तरी ही खबरदरी म्हणून शासकीय यंत्रणा सज्य झाली आहे. वनविभागाचे १६४ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उपवनसंरक्षक १, विभागीय वनसंरक्षक १, सहायक वनसंरक्षक ४, वनक्षेत्रपाल १०, वनपाल २३, वनरक्षक ४५, वनमजुर ८० असे एकूण १६४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १० गस्ती पथक आहेत. २४ ते २६ जुलै पर्यंत तीन दिवस ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे. वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शिराळा शहरा बरोबर ग्रामीण भागातील तडवळे,उपवळे, ओझर्डे, सुरुल, कुरळप या गावावर ड्रोनची नजर असणार आहे.आज ड्रोनच्या माध्यमातून अंबामाता मंदिर, सोमवार पेठ, मोरणा धरण, उपवळे, तडवळे परिसराची चाचणीघेण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक सचिन पाटील, देवकी ताशीलदार, बाबा गायकवाड, संपत देसाई उपस्थित होते.
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग शिराळा व या पाच गावावर ड्रोनच्या माध्यमातून तीन दिवस नजर ठेवणार
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------
भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
----------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
----------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
====================================
==============================================
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments