BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नागपंचमी दिवशी अंबामाता मंदिर दर्शनासाठी बंद:पालखी व पूजे बाबत सोमवारी निर्णय

शिराळा,ता.१८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपंचमी दिवशी  अंबामाता मंदिर दर्शनासाठी बंद असेल पण मंदिरातील देवीची पूजा आणि मानाच्या पालखी पूजनाबाबत सोमवार( ता. २०) रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल ,असे प्रतिपादन प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी केले.      येथील तहसीलदार कार्यालयात २५ जुलै रोजी होणाऱ्या नागपंचमी च्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी पाटील म्हणाले, गर्दी होणार नाही यासाठी शिराळा शहरात येणारे मार्ग बंद करणे आवश्यक आहे.मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून फिरणे , मंदिरात प्रवेश करणे टाळा.वनविभाग , पोलीस यांचा पूर्ण बंदोबस्त असणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे व  कोरोनामुळे असणाऱ्या सार्वजनिक व वैयक्तिक निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

  नागपंचमीच्या दिवशी मानाची पालखी , अंबामाता देवीची पूजा व  नगमंडळांना मंदिरात येऊन नाग मूर्ती पूजा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. त्यादिवशी शहर बंद ठेवल्यास बाहेरील नागरिक शहरात येणार नाहीत अशी सूचना करण्यात आली.       यावेळी यावेळी तहसीलदार गणेश शिंदे , गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल ,  सहाय्यक वनसवरक्षक जी. आर. चव्हाण ,मुख्याधिकारी योगेश पाटील , नगराध्यक्षा अर्चना शेटे , उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील , संभाजी नलवडे , नायब तहसीलदार अरुण कोकाटे , वनक्षेत्रपाल सुशांत काळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम , नगरसेवक संजय हिरवडेकर , सुनीता निकम , प्रतिभा पवार , आशाताई कांबळे , नेहा सुर्यवंशी , विजय दळवी , उत्तम डांगे , सीमा कदम , बसवेश्वर शेटे , आगारप्रमुख धन्वंतरी ताटे , चंद्रकांत देशमुख , सम्राट शिंदे , संजय इंगवले , डॉ मनोज महिंद , प्रणव महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे , अमित गायकवाड  उपस्थित होते.

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

----------------------------------------

Post a Comment

0 Comments