शिराळा,ता.१७: येथील अमीर करीम मोमीन ( वय ६५ ) यांनी संस्था विलगिकरण केलेल्या ठिकाणी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना काल गुरुवारी दुपारी घडली होती.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात प्राथमिक नोंदवलेल्या घटनेत अमीर यांचा चालताना पाय घसरून डोक्यावर पडल्याने डोक्यास मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झालेची नोंद करण्यात आली होती. यानंतर प्राथमिक तपास व तेथील माहिती व पुरावे तपासल्यावर अमीर यांनी जिन्यावरून उडी घेतली. यामध्ये डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांचे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिली.
अमीर हे दि ७ रोजी उदगाव कोल्हापूरहुन आले होते. त्यामुळे त्यांना संस्था विलगिकरण करून ठेवण्यात आले होते. गुरुवार ता.१६ रोजी दुपारी त्यांनी आत्महत्या केली. यावेळी त्यांचे डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे डॉ सौ योगिता माने यांनी शवविच्छेदन केले यामध्ये डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.याबाबत शिराळा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार पी. व्ही. रजपुत हे करीत आहेत.
___________________________________________इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
---------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments