BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

ब्रेकिंग न्यूज

सांगली जिल्ह्यात ७० कोरोनाचे रुग्ण सापडले. आटपाडी तालुका ७, कवठेमहांकाळ २, मिरज १,पलूस ३,महानगरपालिका कार्यक्षेत्र ५७ असे एकूण ७० रुग्ण सापडले.



सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : विविध आंदोलने व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 24 जुलै ते 5 ऑगस्ट 2020 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.  या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे. मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 24 जुलै 2020 रोजीच्या 00.01 वाजल्यापासून ते  दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

इतर बातम्या

शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास 

इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.



निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर 

कोरोनाचे 139 पैकी 119  रुग्ण झाले बरे

जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले

मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे  फेस शिल्ड वाटले


--------------------------------------------------------------------------------

तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील

---------------------------------------------------------------------------------

भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  बंद पडले.


----------------------------------------------------------------------------------------

 कोरोनाच्या  कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन


----------------------------------------------------------------------------------------

शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती 

---------------------------------------------------------------------

मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु

आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
====================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण

----------------------------------------------------------------------------------------

लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ

------------------------------------------------------

 नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त

Post a Comment

0 Comments