महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करा-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली(जि. मा. का.) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बँकांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकिय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 चा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ज्या व्यक्तींची अद्याप शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा प्रकरणी प्राप्त होणारी रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता शासनास परत करावी. तसेच गैरलाभाच्या प्रकरणांपैकी ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे त्या व्यक्तींकडून सदरची रक्कम वसूल करून यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील वित्तीय संस्थेमध्ये 7/12 नसताना कर्जवाटप करून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने 12 व्यक्तींवर यापुर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशाच पध्दतीने जिल्ह्यात इतर ठिकाणी देखिल या योजनेचा गैरलाभ घेण्यात आल्याची शक्यता असल्याने बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकिय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. यामध्ये मिरज तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांची यादी वगळता जिल्ह्यातील कर्जखात्यांची शासकिय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी करण्यात आली आहे. सदर तपासणी अहवालानुसार सांगली जिल्ह्यातील एकूण 141 व्यक्तींनी महात्मा जोतिराव फुले शेतकारी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा गैरलाभ घेतला असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांमध्ये व्यक्तींच्या नावे शेतजमीन नसताना विना 7/12 उताऱ्याची 60 कर्जप्रकरणे, पीक कर्जाव्यतीरीक्त सामान्य कर्जे, गाय/ म्हैस/ शेळी बाबतची कर्जे, इतर व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाचा समावेश चूकीच्या पध्दतीने कर्जमुक्ती योजनेमध्ये करणे अशी ५२ प्रकरणे, क्षेत्र नसताना बनावट 7/12 दाखल करून घेतलेली कर्जाची ७ प्रकरणे, जमीन विक्री केलेली असताना कर्ज उचलीची ७ प्रकरणे, 7/12 आहे परंतू जादा कर्जवाटपाची ३ प्रकरणे, यापूर्वी गुन्हा दाखल असलेली १२ प्रकरणे. अशी एकूण १४१ प्रकरणे असून यातील अपात्र ११० कर्ज खात्यांवर सुमारे ९२ लाख ४२ हजार ८३३ रूपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे.
गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांचा बँकनिहाय पुढीलप्रमाणे आहे - बँक ऑफ बडोदा मधील ३० अपात्र खात्यांपैकी 25 खात्यांवर ७ लाख ४३ हजार ६६३ रूपये, बँक ऑफ इंडिया ३९ अपात्र खात्यांपैकी ३३ खात्यांवर ३६ लाख १३ हजार ८१३ रूपये, एचडीएफसी बँक मधील ४ अपात्र खात्यांवर १ लाख ९८ हजार १३ रूपये, बँक ऑफ महाराष्ट्र मधील एका अपात्र खात्यावर ३० हजार २४९ रूपये, कार्पोरेशन बँक कराड / वांगी मधील ३२ अपात्र खात्यांपैकी १७ अपात्र खात्यांवर २० लाख ६ हजार ५३१ रूपये, बँक ऑफ बडोदा कराड मधील ३ अपात्र खात्यांवर ३ लाख ९४ हजार १३२ रूपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली मधील ३२ अपात्र खात्यांपैकी २७ अपात्र खात्यांवर २२ लाख ५६ हजार ४३२ रूपये, अशा एकूण ११० अपात्र कर्ज खात्यांवर ९२ लाख ४२ हजार ८३३ रूपये गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. सदर प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सांगीतले.
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
इतर बातम्या
शाळापूर्व तयारी - घरचा अभ्यास
इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोजचा घरचा अभ्यास PDF स्वरूपात डाउनलोड करा खालील लिंकवरून.
निर्मिती : प्रविण डाकरे सर व जयदीप डाकरे सर
कोरोनाचे 139 पैकी 119 रुग्ण झाले बरे
जंगलात शिकारीला गेले अन् स्वत:च शिकार बनले
मुलगी झाली म्हणुन त्यांनी जिलेबी नव्हे फेस शिल्ड वाटले
--------------------------------------------------------------------------------
तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल- पालकमंत्री जयंतराव पाटील
---------------------------------------------------------------------------------भर पावसात सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बंद पडले.
---------------------------------------------------------------------------------------------------------
कोरोनाच्या कुरुक्षेत्रावरील आधुनिक कृष्ण, अर्जुन
-------------------------------------------------------------------------------------------------------------
शिराळा तालुक्यात भांगलण,कोळपण,रोप लावणीच्या कामांना गती
---------------------------------------------------------------------
मुंबईत पोलीसमध्ये असलेल्या शिराळच्या सुपुत्राचा कोरोनाने मृत्यु
आरोग्य सुविधांसाठी पाठपुरावा करणार-सभापती वैशाली माने
==========================================
==============================================
शिराळा तालुक्यातील 35 हजारावर जनावरांना लसीकरण
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
लॉक डाऊन मध्ये यांच्या अंगणात या पाहुण्यांची वर्दळ
---------------------------------------------------------------------------------
नागाची १९ पिल्ले निसर्ग अधिवासात मुक्त
---------------------------------------------------------------------------------
9 जुलैपासुन मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 9 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू रहाणार
============================================प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवास व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस रहाणार सुरु-
==============================================
चांदोलीत अतिवृष्टी झाल्याने गेल्या २४ तासात ८२ मिलीमीटर पावसाची नोंद
==============================================
कोरोना मुक्त दाम्पत्यावर फुलांची उधळण
==============================================
प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड स्वातीताई पाटील
==============================================
नाटोलीच्या दगडू पाटील यांचे निधन
==============================================
त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस
===============================
कोरोनाच्या संकटात ही सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात
==============================================
तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख
==============================================
जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20
==============================================
कासवाच्या तोंडात गळ अडकला अन्
==============================================
मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान
==============================================
गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी
---------------------------------------------------------------------------------
ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...=============================================
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर
==============================================
तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक
==============================================
प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर
---------------------------------------------------------------------------------कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ==============================================भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-
---------------------------------------------------------------------------------
चिखली येथे २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान
======================
======================
0 Comments