शिराळा,ता.22: माणसाचा जन्म आणि मृत्यु हा अटळ आहे.दोन्ही ही कोणाच्या हातात नाही. पण जन्म व मृत्यु झालेेले दिवस दोन्ही दिवस साजरे केले जातात. ते म्हणजे वाढदिवस आणि श्राद्ध. फरक एवढाच वाढदिवस स्वत: तर श्राद्ध दुस-याने घालायचे असते. मग जिथं आपला शेवट होतो. त्याच ठिकाणी म्हणजेच स्मशानभुमीत आपला वाढदिवस साजरा केला तर............. असे म्हणुन त्याने आपल्या मित्रांच्या साक्षीने रात्री दहा वाजता वाढदिवस साजरा करुन भयान शांततेत आनंदोत्व साजरा केला. मित्रानो ही कहाणी आहे शिराळा तालुक्यातील शिंदेवाडी येशील अनिस कार्यकर्ता योगेश शिंदे याच्या स्मशानातल्या वाढदिवसाची.
खरं तर 'स्मशानभुमी' म्हटलं कि भल्याभल्यांच्या उरात धडकी भरल्याशिवाय रहात नाही. कारण या स्मशानभुमीबद्दल लहानपणा पासुन मनात भिती निर्माण केली आहे. तीचे अस्तीत्व आज ही कायम आहे. त्यामुळे बालवयातील ही भिती म्हातारपणी ही सोडत नाही. तेच संस्कार नातवंडांवर रुजवले जातात.
त्यामुळे या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसांन्यांच्या मनातील भीती दुर व्हावी यासाठी 'अनिस' च्या युवकांकडून वाढदिवसाच्या औचित्याने अशा अंधश्रदाळू बाबींपासून विशेषतः संगणकीय युगातील युवकांना वाचविण्यासाठी हे युवक प्रयत्न करत आहेत. श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. स्मशानभूमी असो वा इतर कोणत्याही ठिकाणची अंधश्रद्धा असो त्याची सत्यता जाणून घेऊनच विश्वास ठेवायला हवा.
अशा परिस्थिती आपण जे वाचतो, आपल्याकडे जे ज्ञान असते ते फक्त डोक्यात ठेवून चालणार नाही. तर ते कृतीत आणले पाहिजे. स्वतः मधील भीती दुर व्हावी या उद्देशाने रात्री दहा वाजता शिंदेवाडी येथील अनिसचे समर्थक योगेश शिंदे याने आपले सहकारी शिक्षक सुवर्णसिंग मस्के, आकाश आढाव, अभय कुंभार, रोहित शिंदे आदींच्या उपस्थितीत रात्री दहा वाजता मांगरुळ येथील स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यात आला.
या परीसरातील ही नवी संकल्पना होती. सवसामान्यांच्या मनातील भीती दुर करण्याचा हा प्रयत्न होता. वाढदिवस स्मशानात सादरा करा अशी केवळ भाषणबाजी न करता ती कृती करुन यागेशने युवकांना वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------आनंदाची बातमी-शिराळच्या कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन रुग्ण कोरोना मुक्त
----------------------------------------------------------------------------------------
वाचा- बंदिस्त बिबट्याने ठोकली जंगलात धुम
----------------------------------------------------------------------------------------
मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच- जलसंपदामंत्री जयंत पाटील
----------------------------------------------------------------------------------------
मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा
व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस उपाधिक्षक
----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------
0 Comments