BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच- जलसंपदामंत्री जयंत पाटील

मांगले - सावर्डे बंधाऱ्यांची पाहणी करताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील,आ. मानसिंगराव नाईक,  विराज नाईक मुख्य अभियंता आर.डी. मोहिते   

मांगले- शिराळा व पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदायीन असलेल्या मांगले येथील वारणा व मोरणा या दोन नद्यांच्या संगमावरील मांगले- सावर्डे या कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा  विशेष दुरुस्तीच्या सुधारीत   काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे  जलसंपदा  मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

महत्वाची बातमी-----शिराळा व कोकरूड येथे अतिदक्षता विभाग सुरू करा-  पालकमंत्री जयंतराव पाटील

        मांगले ( ता.शिराळा) येथिल  सावर्डे बंधाऱ्यांची पाहणीजलसंपदा मंत्री जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक विराज नाईक  यांनी देखभाल व दुरुस्ती संदर्भात पाहणी केली. यावेळी जलसपंदा  विभागाने दुरुस्ती संदर्भात पाठवलेल्या कामाचा आढावा घेतला. हा बंधारा चांगल्या प्रकारे विशेष बाब म्हणून भक्कम व्हावा अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासून मागणी होती दहा हजार एकर क्षेत्राला पाणी पुरवठा होत आहे आमदार मानसिंगराव नाईक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडे पाठपुरावा केला होता
     मुख्य अभियंता कोल्हापूर यांनी  बंधारा विशेष दुरुस्ती ची मागणी  प्रस्तावाद्वारे केली होती.  दुरुस्तीच्या अंदाजे  ४ कोटीच्या सुधारीत  प्रस्तावाला अद्यापही प्रशासकीय मजुरी मिळालेली नव्हती. मात्र आज मंत्रीपाटील यांनी या बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सदर काम लवकरात लवकर हाती घेऊन ते पूर्ण करणार असल्याचे  उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
       यावेळी  मुख्य अभियंता आर.डी मोहिते, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉं. अनिल बागल,  माजी सरपंच राजेंद्र दशवंत, राहुल पवार, विश्वासचे संचालक दत्तात्रय पाटील, सुरेश पाटील,समीर कुलकर्णी, संदीप शिंदे, धनटेक पाणी योजनेचे अध्यक्ष जयवंत पाटील, सचिव अशोक चरापले,अधीक्षक अभियंता महेश सुर्वे,  कार्यकारी अभियंता मिलिंद टिटवाडकर,टी.एस. धामणकर, रामभाऊ पाटील आदी उपस्थि होते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

शिराळे खुर्दमध्ये ५३वर्षीय  पुरुष कोरोना पॉझिटिव्ह

मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा 

व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

----------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

----------------------------------------------------------------------------------------

   

Post a Comment

0 Comments