BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक

ब्रेकिंग न्यूज

सांगली जिल्ह्यात आज 41 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले असुन सर्वाधिक म्हणजे 24  जत तालुक्यातील  बिळुर येथे आहेत. आटपाडी तालुक्यातील  कानकात्रेवाडी 2,नेलकरंजी  1. खानापुर तालुक्यात गार्डी1,विटा 3, वाळवा तालुका वाळवा  1, इस्लामपुर 1, करंजवडे 1.  सांगली महानगरपालिका 7 असे एकुण 41 पॉझिटिव्ह आले आहेत.

शिराळा तालुक्यातील मणदुर येथील70 वर्षाची महिला व शिराळे खुर्द येथील 39 वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाले आहेत.  

 प्रेस क्लब ऑफ शिराळा कार्यकारिणी सत्कार करताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक ,रणजितसिंह नाईक , भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील उपस्थित होते.

शिराळा: तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे. तालुका प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेला प्रेस क्लब ऑफ शिराळा निश्चितच सामजिक कर्तव्य बजावत समाजातील सर्व घटकांना समान न्याय देईल यात तिळमात्र शंका नाही असे मत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले.


          प्रेस क्लब ऑफ शिराळा कार्यकारिणी सत्कार करताना ते बोलत होते. भाजपा तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील प्रमुख उपस्थित होते.माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. शिराळा तालुका प्रतिनिधी यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात संचारबंदी असताना सर्व नियमांचे पालन करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. अनेक ठिकाणी जात आपला जीव धोक्यात घालून त्यांनी गरजूंना मदत केली आहे. त्यांचे तालुक्याच्या विकासात योगदान मोलाचे आहे.या सर्व पदाधिकारी याचे पाठीमाग सम्पूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उभा राहतील पत्रकारांच्या एकजुटीसाठी एकत्र येत सामजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या प्रेस क्लब ऑफ शिराळा अध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच चांगले काम करेल.


     आम्ही नेहमीच पत्रकार बांधवांच्या सोबत आहोत. आपल्याला सोबत घेऊनच जनतेच्या सहकार्याने हा विकासरथ पुढे नेण्याचे कार्य करत आहोत. पत्रकारांच्या लेखणीतून आणि जनेतेने दिलेल्या प्रेमाने आम्ही वाटचाल करीत आहोत. समन्वयातून काम केल्यामुळे आम्हाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेस क्लब ऑफ शिराळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा
       यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनेश हसबनीस, विकास शहा, विठ्ठल नलवडे, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रितम निकम, अजित महाजन, युवानेते रणजितसिंह नाईक, नगरसेवक बंडा डांगे, प्रदीप कदम, वैभव गायकवाड,  सम्राट शिंदे, राजू पाटील, बबलू शेळके, संतोष गायकवाड, सचिन यादव, संतोष यादव, भरत निकम, विद्याधर कुलकर्णी यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
=====================================================================

खालील  हेडींगवर क्लिक करुन वाचा  या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...

====================================================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

=====================================================================

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------



Post a Comment

0 Comments