BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चिखली येथे २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

 चिखली येथे आमदार मानसिंगराव नाईक यांचा वाढदिवस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापनदिनानिमित्त आज झालेल्या रक्तदान शिबीरात स्वःत रक्तदान करून उद्घाटन करताना युवा नेते विराज नाईक. शेजारी इतर पदाधिकारी, अधिकारी व इतर मान्यवर.


शिराळा : आमदार मानसिंगभाऊंनी त्यांच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून कोरोना लढ्यासाठी विविध सामाजिक हिताचे उपक्रम राबवून एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे, असे प्रतिपाद युवा नेते विराज नाईक यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथे आज आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्याऔचीत्याने झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन व वृक्षारोपन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलावडे, विश्वासचे  संचालक विश्वास कदम प्रमुख उपस्थित होते.
युवा नेते नाईक म्हणाले, शिराळा मतदार संघात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आमदार मानसिंगभाऊंनी मोठे काम केले आहे. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक कुटूंबाला "अर्सेनिक अल्बम ३०" या होमीओपॉथी गोळ्याचे वाटप, सवलतीच्या दरात सर्व ग्रामपंचायतींना सॅनिटायझर, प्रत्येक संस्था कोरंनटाईन सेंटरसाठी सॉनिटाझर, शिराळा व इस्लामपूर।येथील कोविड सेंटरला मदत, मास्क, चादरी व बेडशिट, नगरपंचायत क्षेत्रातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस आदीनां प्रोत्साहनपर प्रत्येकी एक हजार रुपयांचे वाटप, आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड वाटप, अडकून पडलेल्या पर जिल्ह्यातील, राज्यातील लोकांना मदतीचे किट वाटप पशुखाद्याचे वाटप, कोरोना लढाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कोविड योद्यांचा सत्कार व प्रशस्तीपत्र वाटप आदी उपक्रम राबविले आहेत.
ते म्हणाले, आमदार मानसिंगभाऊ यांनी स्वःच्या आरोग्याची पर्वा न करता संपूर्ण मतदार संघात फिरून लोकांच्या कोरोना विषाणू विषयी जागृती केली. स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, प्रमुख मंडळी तसेच आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलिस यंत्रणेला सतर्क केले. ज्या गावात कोरोनाचे रुग्ण सापडले, तेथे जलसंपदामंत्री मा. जयंतराव पाटील, जिल्हधिकार्‍यांसह इतर सर्व अधिकार्‍यांच्याबरोबर भेटी देवून परिस्थिती व लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या व त्यांची सोडवणूक केली. कोरोना विरुध्दच्या लढईत रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे, म्हटल्यावर त्यांच्या सूचनेवरून विश्वास व विराज उद्योग समुहातील कर्मचार्‍यांचे रक्तदान करून त्याचाही खारीचा वाटा भाऊंच्या योगदानात कोरोना विरुद्धच्या लढ्यात दिला.
प्रारंभी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी युवा नेते नाईक यांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराचे उद्घाटन केले. कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, कार्यालय अधीक्षक संभाजी पाटील, प्रणव पाटील तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण रक्तपेढीचे डॉ. संध्या पाकले, विवेक चव्हाण, अशोकराव यादव, विश्वजीत साळुंखे, कुंडलिक यादव, अतिष बेळगावकर, सचिन कुंभार यांनी रक्तदात्यांकडून रक्ताचे संकलन केले. यावेळी युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते विश्वास कारखाना परिसरात वृक्षारोनही करण्यात आले. शिबिरात एकूण २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व-अभय पाटील सरपंच औंढी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजकारणा पेक्षा समाजकारणाला प्राधांन्य देणारे नेतृत्व- किर्तीकुमार पाटील उपनगराध्यक्ष  शिराळा नगरपंचायत
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments