BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मक्याची आधारभूत किंमत प्रति क्विंटल 1760 रुपये


भरडधान्य (मका) खरेदी केंद्रे सुरु- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

खरेदी केंद्रे 30 जून 2020 पर्यंत सुरु राहणार 

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये व शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा या हेतूने प्रथमच रब्बी हंगामामध्ये उत्पादीत झालेल्या भरडधान्यासाठी (मका) जिल्ह्यात चार ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्रे  सुरु करण्यात आली आहेत. त्यासाठीमक्याची आधारभूत किंमत प्रति क्विंटल 1760 रुपये  इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही केंद्रे दिनांक 30 जून 2020 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
                      जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील सर्व गावांसाठी ॲड आर. आर. पाटील शेतकरी सहकारी संघ, तासगाव, जत तालुक्यातील शेतकऱ्यासाठी विष्णू आण्णा सहकारी खरेदी विक्री संघ, सांगली, ठिकाण – जत, खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यासाठी खानापूर तालुका खरेदी विक्री संघ, विटा, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी येथे खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये खरेदी केंद्र उघडण्यात आली नाहीत त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांना जवळ असलेल्या खरेदी केंद्रासाठी नोंदणी करुन त्या ठिकाणी भरडधान्याची विक्री करावी.
शेतकऱ्याकडील भरडधान्य खरेदी करण्यासाठी ऑनलाईन खरेदी पध्दत सुरु करण्यात आलेली असल्यामुळे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी आधार क्रमांक, बचत बँक खाते क्रमांकसह नोंदणी होणे आवश्यक आहे. पणन हंगाम 2019-20 करीता neML NCDEX Group Company यांचे Platform वर नोंदणी करुन केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्या नोंदी PFMS (Public Fund Management System) करणे अनिवार्य आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले परंतु खरेदी न झालेले भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबधित शेतकऱ्याचीच राहील. शेतकऱ्याकडील जमिनीचा सातबारा उताऱ्यावर भरडधान्याखालील पिक (मका) क्षेत्रासह नोंद असणे आवश्यक आहे. अशी नोंद असणारा सातबारा उतारा शेतकऱ्याने खरेदी केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या अहवालानूसार सांगली जिल्ह्याची मका पिकाची सरासरी उत्पादकता 2591.9 किलो  प्रतिहेक्टर अशी आहे. संबंधीत शेतकऱ्याचे मका पिकाखालील क्षेत्र व सरासरी उत्पादकता याचा विचार करुनच खरेदी केली जाईल. खरेदी केंद्रावर केवळ रब्बी हंगाम 2019-20 मधील उत्पादित मक्याची खरेदी  केली जाणार आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत गतवर्षीचे जूने भरडधान्य खरेदी केले जाणार नाही. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर आरोग्य विषयक सुरक्षेततेबाबत आवश्यक ती काळजी घेणेत यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालय, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2670820 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
0000

Post a Comment

0 Comments