BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आता दादाच्या लग्नात नवरी नटणार अन् कलवरी ठुणकणार


नियमांचे पालन करण्याच्या अटींवर 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

खुले लॉन, नॉन ए.सी. मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात आता लग्न समारंभास परवानगी



सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग चे पालन करून लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी  महाराष्ट्र शासनाच्या दि. 31 मे रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेली आहे. तथापि हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख आदेशामध्ये नाही. 50 लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे विविध सूचना व मागण्या विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय / हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे राज्य शासनाकडून दि. 22 जून रोजीच्या आदेशान्वये कळविले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलीे.


त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्देशांचे पालन करण्याच्या अटींवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी दिली असून तसे आदेश जारी केले आहेत.
तथापि लग्न समारंभ पार पाडत असताना पुढील बाबी करणे बंधनकारक राहील. भविष्यात लग्न समारंभात सामील व्यक्तीपैकी एखादा व्यक्ती कोविड-19 चा रूग्ण आढळल्यास सदर रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सहजरीत्या होण्याकरीता लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची (व्यवस्थापक कर्मचारी सहित) यादी संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह तसेच घर मालक यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवणे बंधनकारक राहील. लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग मशिन ने थर्मल स्क्रिनिंग करणे व त्याची नोंद ठेवणे संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह यांच्यावर बंधनकारक राहील.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर

=====================================================================
=====================================================================

निगडी येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह तर तालुक्यातील 7 कोरोना मुक्त 22.6.20

========================================================================

वाचा- कहाणी स्मशानातल्या वाढदिवसाची

========================================================================

आनंदाची बातमी-शिराळच्या  कोविड उपजिल्हा रुग्णालयातून उपचार घेणारे तीन  रुग्ण कोरोना मुक्त

===============================================

=====================================================================

मांगले- सावर्डे बंधारा दुरुस्ती लवकरच-  जलसंपदामंत्री जयंत पाटील

=======================================================================

मोलमजुरी करणाऱ्यांंचा मुलगा 

व -भाजीविक्रेत्या आज्जीचा नातू बनला पोलीस  उपाधिक्षक

=====================================================================

घागरेवाडीत जनावरांच्या शेडमध्ये घुसला बिबट्या

========================================================================================

Post a Comment

0 Comments