BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व------

ब्रेकिंग न्युज

शिराळा तालुक्यातील मणदुर येथे 26,60,61 वर्षाचे तीन पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. शिराळा तालुक्यातील एकुण रुग्णांची संख्या 135 झाली आहे. 

जिल्ह्यात 15 रुग्ण आहेत. आज अखेरजिल्ह्यात एकुण रुग्ण 519 असुन  उपचाराखालील  रुग्ण 229  तर आज अखेर बरे झालेले रुग्ण 277 आहेत.



 शिराळा तालुक्याच्या औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व म्हणून आमदार मानसिंगराव नाईक यांचेकडे पाहिले जात आहे.अशा उदात्त हेतूने काम करणाऱ्या या नेतृत्वाच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यकतृत्वाचा घेतलेला हा आढावा.----------


 २६जून१९५९ रोजी मानसिंगराव नाईक(भाऊ)  यांचा जन्म चिखली येथे झाला. त्यांचे चिखली,कांदे,शिराळा येथे प्राथमिक शिक्षण झाले. फत्तेसिंगराव नाईक(आप्पा)कारखान्याची धुरा सांभाळत होते . त्यावेळी नैसर्गिक परिस्थिती,ऊस टंचाई,वआर्थिक अडचण असल्याने अनेक संकटावरती मात करणे सुरू होते.बंद कारखान्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष परिणाम नाईक कुटुंबीयांच्यावरती झाला होता.त्यावेळी भाऊंनी शिक्षण अर्धवट सोडून व्यवसायाकडे लक्ष दिले.चांदोली धरणामुळे या परिसरात झालेली पाण्याची सोय व आप्पांनी केलेली प्रयत्नांची शिकस्त यामुळे बंद कारखाना सुरू झाला.तालुक्याच्या विकासाला वेगळी वाट मिळाली.त्यावेळी भाऊंनी कारखान्यात ऊस व साखर वाहतूक केली.कारखाना सुरळीत सुरू असताना पुन्हा नाईक कुटुंबीयांच्यावरती आप्पा आजारी पडल्याने संकट आले. त्यावेळी कुटुंबाची जबाबदारी भाऊंच्यावरती आली.सन २००० मध्ये आप्पांनी कारखान्याच्या निवडणुकीची संपुर्णधुरा भाऊंच्यावरती सोपवली. त्यांनी निवडणूक बिनविरोध करून सहकारात एक वेगळा पायंडा पाडला तो आज ही कायम आहे.१०फेब्रुवारी २००० रोजी त्यांची कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली . त्यावेळेपासून आज पर्यंत कारखान्याच्या नावलौकिकात दिवसेंदिवस भर पडत आहे. कारखान्याने अनेक राज्य व देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त केले आहेत. चांगल्या चालणाऱ्या कारखान्याच्या यादीत विश्वास कारखान्याचा समावेश आहे. कारखान्याची क्षमतेमध्ये वाढ केली असून विविध उपपदार्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना इतर मोठ्या कारखान्यांच्या तुलनेत दर देण्याचे सातत्य कायम ठेवले आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

                                                                                                 अभय पाटील सरपंच औंढी


----------------------------------------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
औद्योगीक क्रांतीत भर घालणारे नेतृत्व-अभय पाटील सरपंच औंढी
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजकारणा पेक्षा समाजकारणाला प्राधांन्य देणारे नेतृत्व- किर्तीकुमार पाटील उपनगराध्यक्ष  शिराळा नगरपंचायत
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments