BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मतदार संघाच्या विकासासाठी आहोरात्र झटणारे नेत्त्व---


ब्रेकिंग न्यज

 आजचे सांगली जिल्ह्यात 32 तर पर जिल्हा व राज्यात 2 रुग्ण सापडले. आटपाडी तालुक्यात 10, जत  तालुक्यात 8, खानापुर तालुका 4,पलुस तालुका 1,तासगाव तालुका 4,वाळवा तालुका 1,सांगली 4 असे एकुण 32 तर पर जिल्हा व राज्यातील विजापुर 1 व कोल्हापुर 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.


सांगलीच्या गणपीती पेठ येथील 68 वर्षीय पुरुष, व पर जिल्ह्यातील व राज्यातील अथणी(बेळगाव) य़ेथील 66 वर्षीय पुरुष, सोलापुर य़ेथील 70 वर्षीय पुरुष यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.


सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णामध्ये शिराळा तालुका नंबर  वन तर जत तालुका नंबर दोनवर आहे.


तालुका निहाय एकुण आकडा- आटपाडी 52,जत 72, कडेगाव27, कवठेमहंकाळ 15,खानापुर 27, मिरज 19, पलुस 37,शिराळा 132, तासगाव 25,वाळवा 58.महानगरपालिका 43.





शिराळा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीन विकासासाठी  आहोरात्र झटणा-या  आमदार मानसिंगराव नाईक यांचा आज वाढदिवस .त्या निमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा........


2009 ते 2014 या कालावधीत मानसिंगभाऊ पहिल्यांदा आमदार झाले. या कालावधीत त्यांनी ज्या गतीने शिराळा मतदार संघाचा विकास केला, असा विकास यापूर्वी जनतेने कधीच पाहिला नव्हाता. सभागृह, काँक्रीट रस्ते, नाले, पाणंद रस्ते, पिण्याच्या पाणी योजना, कुपनलिका, पाइप लाईन, ग्रामपंचायत कार्यालय इमारती, ग्रामसचिवालय इमारतींची कामे मार्गी लावली. तिर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, शिराळ्यातील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, सर्व सोई नियुक्त आय.टी.आय मध्ये विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, अत्यंत देखणी शिराळ्यातील बस स्थानक इमारत, शिराळा येथे 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालय इमारत, बिळाशी, येळापूर, पाचगणी व चिकुर्डे येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी, पाचगणी, खराळे, चिंचेवाडी व जाक्राईवाडी येथे आरोग्य उप केंद्रास मंजूरी आणली आहे.

  वीजेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिराळा औद्योगिक वसाहत, कणदूर, बिळाशी व करंजवडे येथील वीज उपकेंद्र, खराब झालेले वीजेचे खांब बदलणे, पर्यटन विकासमधून शिराळा शहरात 2 कोटी 26 लाख रुपयांची विकासकामे साधली. शासनदरबारी सातत्याने प्रयत्न करून रखडलेल्या वाकुर्डे बुद्रूक योजनेस निधी मिळवून वारणेचे पाणी उत्तर भागातील वाकुर्डे तलावात आणले. उत्तर भागातील जनतेची गिरजवडे एम.आय. टँकची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णी केली. शिराळा विधानसभा मतदार संघासाठी मानसिंगराव नाईक यांचे नेतृत्व हवे हे येथील जनतेला 2014 ते 2019 मध्ये आलेल्या अनुभवावरून प्रकर्षाने जाणवले. म्हणून त्यांनी परिवर्तन घडवत पुन्हा सत्तेची सूत्रे भाऊंना आमदार करून दिली. आपल्या सुदैवाने राज्यातही महाआघाडीचे म्हणजेच आपल्या विचाराचे सरकार आले आहे. जलसंपदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांच्यासह सर्व मंत्री महोदय व पक्षाच्या आमदारांचा भाऊंच्याविषयी विषेश लोभ आहे. 2014 ते 2019 दरम्यान जसा विकासाचा उरक तुम्ही पाहिला तोच झपाटा यापुढेही पहायला मिळेल, यावर मतदार संघाचा विश्वास कायम आहे. त्याची पहिली चुणूक भाऊंनी मार्च 2020 च्या अर्थसंकल्पात दाखवून दिली आहे. त्यांनी वाकुर्डे बुद्रूक योजना पूर्णकरण्यासाठी 100 कोटी व वारणा प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद जलसपंदा मंत्री मा. ना. जयंतराव पाटील यांच्याकरवी करून घेतली आहे. 

                                        विजयराव नलवडे  (अध्यक्ष शिराळा तालुका राष्ट्रवादी  कॉंग्रेस)

खालील  हेडींगवर क्लिक करुन वाचा  या आठवड्यातील इतर महत्वाच्या बातम्या 

======================================================

कोरोना मुक्त दाम्पत्यावर  फुलांची उधळण

========================================================

 प्रहार संघटनेमध्ये वाळवा अघ्यक्षपदी  मीराताई शिंदे तर शिराळा अध्यक्षपदी अँड  स्वातीताई  पाटील

==========================================================

नाटोलीच्या  दगडू  पाटील  यांचे निधन

=============================================================

त्यांनी साजरा केला चक्क मियावाकी जंगलाचा वाढदिवस

===============================

 कोरोनाच्या संकटात ही  सर्ज्या राजाची जो़डी अव्वल=बेंदुर उत्साहात

============================================================

तर रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर-सत्यजीत देशमुख

=============================================================

 जिल्ह्यात लॉकडाऊन- अफवा कि सत्य 4.7.20

=============================================================

कासवाच्या  तोंडात गळ अडकला अन्

===============================================================

 मांगलेत झाला कोरोना योद्ध्यांचा सन्मान

================================================================

गोरक्षनाथांची आषाढी एकादशीची वारी भक्ताविना सुनी सुनी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 ते म्हणतात सांत्वनासाठी येऊ नका, घरातच थांबा...

====================================================================

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर

=====================================================================

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान मोलाचे- माजी मंत्री शिवाजीराव नाईक 

=====================================================================

प्राथमिक आरोग्य केंद्राला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करू - जि.प. सदस्या अशाताई झिमूर 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोंडाईवाडीच्या रानफुलांची भुरळ

=======================================================================

भुताचा उताराच त्या युवकांनी पळवला अन्-

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

चिखली येथे  २०० हून अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

=====================================================================

ऐतवडेत ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा

---------------------------------------------------------------------------------------

विशेषवृत्त-लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटांनी मास्क विक्रीतून 20 लाखांची केली कमाई 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोना योद्धा आमदार मानसिंगराव नाईक वाढदिवस विशेष

इतर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-===========================================================================
========================================================================
=====================================================================
========================================================================
========================================================================
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------






Post a Comment

0 Comments